Sonali Phogat: सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलीस Action मोडमध्ये, समोर आली मोठी अपडेट

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 30, 2022 | 14:57 IST

Sonali Phogat Goa Police:या प्रकरणी गोवा सरकारने (Goa government) गरज पडल्यास सीबीआय चौकशी करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.

Sonali Phogat Case
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • सोनालीचे पीएम सुधीर सांगवान आणि त्याच्या साथीदारासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
  • सोनालीच्या कुटुंबियांनी केलेल्या खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांनी हिसार येथे जाण्याचा निर्णय घेतला होता.
  • या प्रकरणी गोवा सरकारने (Goa government) गरज पडल्यास सीबीआय चौकशी करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.

नवी दिल्ली: Sonali Phogat Death Case: टिकटॉक स्टार (TikTok star) आणि भाजप नेत्या (BJP leader)  सोनाली फोगाट  (Sonali Phogat) यांच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक (Goa Police team) हिसारला (Hisar) जात आहे. सोनालीच्या कुटुंबियांनी केलेल्या खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांनी हिसार येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी गोवा सरकारने (Goa government) गरज पडल्यास सीबीआय चौकशी करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. 

याप्रकरणी सोनालीचे पीएम सुधीर सांगवान आणि त्याच्या साथीदारासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. सोनालीला कोणते ड्रग्स देण्यात आले होते, याची माहितीही गोवा पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा-  लहान बाळांना 'या' तेलांनी करा मसाज, हाडं होतील मजबूत

सोनालीला दिले होते ड्रग्ज

भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास केला असता आरोपीने तिला गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये मेथॅम्फेटामाइन नावाचे ड्रग्ज दिले होते. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. आरोपी सुधीर सांगवाननं दिलेल्या जबाबाच्या आधारे मृत सोनाली फोगाटला देण्यात आलेले ड्रग्ज कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून जप्त करण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले. ड्रग्जची ओळख मेथॅम्फेटामाइन असे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी