हरियाणा: Sonali Phogat Death Case: टिक टॉक स्टार सोनाली फोगाट (sonali phogat) मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोवा पोलीस (goa police) हिसारमध्ये आहेत. दरम्यान, सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात हरियाणा पोलिसांना (Haryana Police) मोठे यश मिळाले आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी ऑफिसचा लॅपटॉप, फोन आणि डीव्हीआर चोरल्याचा आरोप करणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator) शिवमला (Shivam) पोलिसांनी अटक केली आहे. (Sonali Phogat Death Case)
गोवा भाजपनेही सीबीआय चौकशीची केली मागणी
भारतीय जनता पक्षाच्या गोवा युनिटने मंगळवारी सोनाली फोगाट 'हत्या' प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्ज यांनी ट्विट करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा- डार्क सर्कलनं हैराण झालात?, मग वापरा 'हे' तेल
"माझे प्रामाणिक आवाहन आहे. प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावा. नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. असा दुर्दैवी गुन्हा गोव्याला बदनाम करणारा आहे, असं रॉड्रिग्ज यांनी म्हटलं.
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याआधी सांगितले होते की, सरकार आवश्यक असल्यास या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवेल. तर हरियाणा पोलीस मंगळवारी त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते.