Mahesh Babu: Bollywood ला मी परवडणार नसल्याचं वक्तव्य करणारा महेश बाबूचं लवकरच हिंदी सिनेमात डेब्यू

झगमगाट
पूजा विचारे
Updated Aug 03, 2022 | 12:49 IST

Mahesh Babu Bollywood Entry: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूही (South cinema superstar Mahesh Babu) बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

Mahesh Babu
महेश बाबू 
थोडं पण कामाचं
  • साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूही (South cinema superstar Mahesh Babu) बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
  • काही काळापूर्वी महेश बाबूने बॉलीवूडला आपण परवडणार नसल्याचं विधान केले होतं.
  • एसएस राजामौली यांचा हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: Mahesh Babu Bollywood Debut:  साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूही (South cinema superstar Mahesh Babu) बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. बाहुबली डायरेक्टर (Baahubali Director)एसएस राजामौली (SS Rajamouli)  यांच्या सिनेमातून महेश बाबू हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

हिंदी भाषिक राज्यांमधील फॅन फॉलोइंग पाहता साऊथचे सर्व सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं दिसून येत आहे. बाहुबली अभिनेता प्रभास, विजय देवरकोंडा यांच्यानंतर आता महेश बाबूही हिंदी सिनेमात म्हणजेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. 

अधिक वाचा-  गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ''त्यांना माझ्या...''

काही काळापूर्वी महेश बाबूने बॉलीवूडला आपण परवडणार नसल्याचं विधान केले होते, मात्र आता बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्याला हिंदी सिनेमात म्हणजेच बॉलिवूडमध्ये आणण्याची तयारी करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

 

महेश बाबू दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री प्रवेश करण्यास सज्ज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसएस राजामौली यांचा हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी