Brahmastra Movie: कशी असेल रणबीर कपूर-आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्रची कथा, स्वतः SS Rajamouli केला सिनेमाचा Review

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 27, 2022 | 16:41 IST

SS Rajamouli on Brahmastra Movie: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. जाणून घ्या बाहुबली आणि RRR दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी चित्रपटाची कथा कशी सांगितली...

SS Rajamouli
एसएस राजामौली 
थोडं पण कामाचं
  • एसएस राजामौली म्हणाले, 'ब्रह्मास्त्राचे विश्व बनवणे सोपे नव्हते.
  • प्रेम हे सर्व शस्त्रांपेक्षा वरचे असते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
  • बाहुबली (Baahubali) आणि आरआरआर (RRR) सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी चित्रपटाचा रिव्ह्वयू केले आहे.

मुंबई: S.S.Rajamouli on Brahmastra:  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाची चाहते गेल्या चार वर्षांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये उत्तम VFX आणि रालियाची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळते. आता बाहुबली (Baahubali) आणि आरआरआर (RRR) सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी चित्रपटाचा रिव्ह्वयू केले आहे. 

एसएस राजामौली म्हणाले, 'ब्रह्मास्त्राचे विश्व बनवणे सोपे नव्हते. प्रेम हे सर्व शस्त्रांपेक्षा वरचे असते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. प्यार वानर अस्त्र, जल अस्त्र आणि अग्नि अस्त्र किंवा ब्रह्मास्त्र हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. चित्रपटात आपला इतिहास आणि पुराणांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

अधिक वाचा-  जान्हवी कपूरचा साडीतला Hot Look, पाहून व्हाल घायाळ

या शस्त्रांबद्दल आपण लहानपणापासून कथांमध्ये वाचले आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या या दृष्टिकोनाला माझा पाठिंबा आहे. चित्रपट एक परीकथा आहे, कथा सांगण्याची एक पद्धत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय हा चित्रपट दाखवतो, असं राजमौली यांनी सांगितलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी