Taapsee Pannu:राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल विचारताच पापाराझींवर पुन्हा संतापली तापसी पन्नू

झगमगाट
Updated Sep 26, 2022 | 16:35 IST

Taapsee Pannu Angry On Paparazzi: तापसी पन्नूचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पुन्हा एकदा पापाराझींसोबत वाद घालताना दिसत आहे.

थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Bollywood actress Taapsee Pannu) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. क
  • तापसी पन्नूचे पापाराझीसोबतचे (paparazzi) नाते अद्याप काही ठिक झालेले नाही.
  • तापसी पन्नूचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई: Taapsee Pannu Gets Upset At The Paparazzi: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Bollywood actress Taapsee Pannu) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती एका कार्यक्रमादरम्यान पापाराझींवर रागावताना दिसली होती. पापाराझीने सांगितले की ती कार्यक्रमासाठी उशिरा आली होती मात्र अभिनेत्रीने स्पष्ट केले की ती योग्य वेळी आली होती. ही गोष्ट जुनी झाली असली तरी तापसी पन्नूचे पापाराझीसोबतचे (paparazzi) नाते अद्याप काही ठिक झालेले नाही. याचे कारण म्हणजे तापसी पन्नूचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पुन्हा एकदा पापाराझींसोबत वाद घालताना दिसत आहे.

अधिक वाचा-  घरच्या घरी बनवा Coffee बॉडी स्क्रब, त्वचा बनेल तजेलदार 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे ज्यामध्ये तापसी पन्नू पापाराझींवर रागावलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तापसी पन्नू बाहेर येताच पापाराझींनी तिला घेरले आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबद्दल अभिनेत्रीची प्रतिक्रिया मागण्या सुरू केलं.

यादरम्यान, अभिनेत्रीला खूप अस्वस्थ वाटू लागते आणि ती पापाराझींना मागे हटण्यास सांगते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी