द ग्रेट खलीचा टोल प्लाझावर धिंगाणा, कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात; Video झाला Viral

झगमगाट
Updated Jul 12, 2022 | 14:48 IST

द ग्रेट खली यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं
  • द ग्रेट खली यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • या व्हिडिओमध्ये खली टोल प्लाझा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसते आहे.
  • खलीवर टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवी दिल्ली:  Viral Video:  WWE चा माजी चॅम्पियन द ग्रेट खली म्हणजेच दलीप सिंह राणा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खली टोल प्लाझा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसते आहे. 

खलीवर टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यामुळे खलीच्या गाडीला घेराव घालण्यात आल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतेय. मात्र, पोलिसांनी खली यांना तेथून कसेबसं बाहेर काढलं. 

अधिक वाचा-  मुंबईत पावसाचं थैमान,BMC नं केलं महत्त्वाचं Tweet; जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स 

या घटनेवर बोलताना खली म्हणतो की, टोल प्लाझावरचे कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने माझ्या कारमध्ये घुसले होते.

आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं काय झालं आहे टोल प्लाझावर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकणार आहात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी