VIDEO: 'या' अभिनेत्रींना सोशल मीडिया युजर्सने केलं ट्रोल

Bollywood actress trolled: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियात विविध विषयांवरुन ट्रोल होत असतात. मलायका अरोरा, परिणीती चोपडा आणि कंगना राणावत यांनाही नुकतेच ट्रोल करण्यात आले आहे.

these bollywood actress trolled by social media users watch video
VIDEO: 'या' अभिनेत्रींना सोशल मीडिया युजर्सने केलं ट्रोल 

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या चाहत्यांपर्यंत अगदी सहज पोहोचतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी आपल्या आगामी सिनेमा, आयुष्यातील घडामोडींबाबत पोस्ट करत असतात. मात्र, हेच करत असताना सेलिब्रेटींकडून अशा  काही पोस्ट होतात की ज्यामुळे सोशल मीडिया युजर्स त्यांना ट्रोल करण्याची संधीही सोडत नाहीत.

नुकतेच ट्रोल झालेल्या सेलिब्रेटींबाबत बोलायचं झालं तर, अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. या व्हिडिओत मलायका अरोरा रस्त्यावर जॉगिंग करत आहे आणि तिने चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडिया युजर्सने मलायकाला ट्रोल केले आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत आणि परिणीती चोपडा यांनाही सोशल मीडिया युजर्सने ट्रोल केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी