मुंबई: Divyanka Tripathi Cute Video: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर खूप Active असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर असा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत.
हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने असेही सांगितले की, तिने हा व्हिडिओ खूप आधी बनवला होता. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक टीव्ही स्टार्सनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
नीना कुलकर्णी आणि रती पांडेसह अनेक स्टार्संनी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीव्ही स्टार्ससोबतच टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर आणि अभिनेत्रीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
अधिक वाचा- नाश्त्यासाठी झटपट बनवा एकदम टेस्टी तांदळाचे आप्पे