मुंबई: TV actresses got divorced due to domestic violence: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Bollywood actress Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) हा सिनेमा घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. सामाजिक संदेशामुळेही हा सिनेमा चर्चेत आला. पण तुम्हाला माहित आहे का अशा कोणत्या टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी घरगुती हिंसाचारामुळे आपल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतला.
या यादीत श्वेता तिवारी, रश्मी देसाई, निशा रावल या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. श्वेता तिवारीने दोन लग्न केले आहेत. अभिनेत्रीने पहिले लग्न राजा चौधरीशी आणि दुसरे लग्न अभिनव कोहलीशी केले होते. दोन्ही विवाहांमध्ये, अभिनेत्रीला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा- सात वर्षांचा संसार काही क्षणात उद्धवस्त, कौटुंबिक कोर्टातच पतीनं चिरला पत्नीचा गळा
याशिवाय रश्मी देसाईनेही लग्नाच्या 3 वर्षानंतर पती नंदिश संधूपासून घटस्फोट घेतला. अभिनेत्री म्हणाली होती की, ती यापुढे अपमानास्पद संबंधात राहू शकत नाही.