Tv Actress Urfi Javed: Ufff..! रणवीर सिंगची दुसरी बेगम व्हायला आवडले: उर्फी जावेद

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 21, 2022 | 14:13 IST

Urfi Javed On Ranveer Singh: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच खुलासा केला आहे की तिला रणवीर सिंगची दुसरी पत्नी व्हायचे आहे. टीव्ही अभिनेत्रीचा हा व्हिडिओ येथे पहा.

Urfi Javed
उर्फी जावेद  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या आउटफिट्समुळे नेहमी चर्चेत असते.
  • उर्फीनं तिनं तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.
  • लोकांना आपल्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी अपील केलं आहे.

मुंबई: Urfi Javed Statement On Ranveer Singh: आपल्या आउटफिट्समुळे नेहमी चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदनं (TV Actress Urfi Javed) अलीकडेच एक मोठं वक्तव्य (Big Statement) केलं आहे. हे वक्तव्य करत असताना तिनं तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदनं मीडियाशी बोलताना म्हटलं की, तिला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood actor Ranveer Singh) याची दुसरी पत्नी व्हायचं आहे. 

अधिक वाचा- Aaditya Thackeray Speech In Rain: आदित्य ठाकरेंची पवार स्टाईल, मैदानात धो-धो पावसात भिजत शिवसैनिकांशी संवाद

जेव्हा तिला करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये रणवीर सिंगच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं उत्तर दिलं की, तिला रणवीर सिंग खूप आवडतो. पुढे ती म्हणाली की, जर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण वेगळे झाले तर मी रणवीरची दुसरी पत्नी बनण्यास तयार आहे.

आपल्या बहिणींबद्दल बोलताना उर्फी म्हणाली की, त्या सर्व खूप हॉट आहेत. तिनं लोकांना आपल्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी अपील केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी