मुंबई: KRK trolled by Virushka fans: वादग्रस्त अभिनेता केआरके (KRK) त्याच्या विधानांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होतो. केआरकेने नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माला (Virat Kohli and Anushka Sharma) लक्ष्य केले होते. खरं तर, आपल्या एका मुलाखतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (former Team India captain Virat Kohli) डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याविषयी बोलला होता. यावर केआरकेने विराटच्या नैराश्याला पत्नी अनुष्का शर्मा जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटर आहे, जो नैराश्याने ग्रस्त आहे. एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे. यानंतर विरुष्काच्या चाहत्यांनी केआरकेवर जोरदार निशाणा साधला.
अधिक वाचा- म्हणून एकदा तरी 'दुबई' फिरायला जावं
एका यूजरने लिहिले की, 'बॉलिवूडपर्यंत ठीक रहा, आपल्या मर्यादेत रहा.' त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'जोपर्यंत तुम्ही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे बोलत आहात तोपर्यंत तुमचा सर्व मूर्खपणा ठीक आहे. खेळामध्ये प्रवेश करू नका.
विशेषत: विराट कोहलीचे नाव वापरून लक्ष वेधून घेऊ नका. अन्यथा तुम्हाला वाईटरित्या ट्रोल केले जाईल.