11 March Dinvishesh : 11 मार्चला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या...

11 March Dinvishesh । 11 मार्च रोजी काय घडले, इतिहासातील या दिवशी काय घडले, 11 मार्च. पहा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कोणत्या प्रसिद्ध लोकांचा जन्म 11 मार्च रोजी झाला आणि कोणाचा मृत्यू झाला.

11 March Dinvishesh : 11 मार्चला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या... ।
11 March Dinvishesh: What happened on 11 March? Konachi Jayanti-death anniversary, what historical event? Know...  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानदिन
  • पंडिता रमाबाई यांनी विधवा आणि कुमारीकांसाठी शाळा सुरु
  • काही दिवसांपूर्वीच गवळींच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

11 March Dinvishesh । 11 मार्च रोजी काय घडले, इतिहासातील या दिवशी काय घडले, 11 मार्च. पहा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कोणत्या प्रसिद्ध लोकांचा जन्म 11 मार्च रोजी झाला आणि कोणाचा मृत्यू झाला. (11 मार्चला काय घडलं होतं?, जाणून घ्या दिनविशेष)

महत्वाच्या घटना (11 MARCH)

11 मार्च 1818: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
11 मार्च 1886: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
11 मार्च 1889: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन ही शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
11 मार्च 1984: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
11 मार्च 1993: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती

सन्मान पुरस्कार प्रदान.

11 मार्च 1999: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
11 मार्च 2001: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.
11 मार्च 2001: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
11 मार्च 2011: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्म (11 MARCH)

11 मार्च 1873: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९३३)
11 मार्च 1912: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.
11 मार्च 1915: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)
11 मार्च 1916: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९५)
11 मार्च 1985: श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

मृत्यू (11 MARCH)

11 मार्च 1689: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)
11 मार्च 1955: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)
11 मार्च 1957: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.
11 मार्च 1965: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)
11 मार्च 1970: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १८८९)
11 मार्च 1969: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.
11 मार्च 1993: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)
11 मार्च 2006: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी