20 Best Places to Visit Near Pune: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात. केवळ विद्यार्थीच नाही तर या ठिकाणी दरवर्षी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. पुणे आणि आसपासच्या परिसरात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जेथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. तुम्ही सुद्धा वन-डे (एकदिवसीय) ट्रिप प्लान करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबाबत सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही वन-डे ट्रिप एन्जॉय करु शकता. जाणून घ्या या प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत... (20 Best Places Near To Pune: One Day trip Destinations to Pune Read in Marathi)
पवना लेक हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. याच्याजवळपास सुद्धा अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील वातावरणामुळे वीकेंडचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही लेक कॅम्पेनिंगचा आनंद लुटू शकता.
Photo Credit: pawnalakecamping_Instagram
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले खंडाळ्यात मुंबई-पुण्यातून पर्यटक नेहमीच भेट देतात. याच शहरावरुन 'आती क्या खंडाला' हे बॉलिवूडमधील गाणेही प्रसिद्ध झाले होते. खंडाळा हे प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळ्याच्या जवळ आहे. तुम्ही एकाचवेळी खंडाळा आणि लोणावळा या दोन्ही जागांना भेट देऊ शकता.
Photo Credit: KhandalaGhat_vselenophile_Twitter
हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणती सेक्स पोझिशन टाळावी
हनीमूनसाठी लोणावळा हे एक आवडते ठिकाण आहे. मुंबई-पुण्यापासून जवळच असलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यात हिरवाईने बहरते.
Credit: BCCL
ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला अठराव्या शतकातला लोहगड पुण्यापासून 65 किमी अंतरावर आहे. रस्ते मार्गाने तुम्ही लोहगड येथे पोहोचू शकता. या गडाची समुद्रसपाटीपासून उंची 3400 फऊट इतकी आहे. या किल्ल्याला चार मुख्य प्रवेशद्वार आहेत. ज्यामध्ये नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमा दरवाजा आणि महा दरवाजा यांचा समावेश आहे.
Photo Credit: Times Network
हे पण वाचा : या चुका टाळल्यास 2023 मध्ये व्हाल मालामाल
पाचगणी हे एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवता येते. येथे टेकड्या आणि दऱ्या आहेत आणि त्यासोबतच दुसरीकडे निसर्गरम्य असे सौंदर्य सुद्धा आहे.
Photo Credit: Panchgani_maha_tourism_Twitter
पुण्याजवळ असलेले लवासा हे खूपच प्रसिद्ध आहे. येथील अनुभव तुम्ही कधीही विसरू शकत नाही. वीकेंड ट्रिपला तुम्ही वॉटरफॉल सफारी, रॅपलिंग, रॉक क्लाईंबिंग, बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
Photo Credit: Lavasa_maha_tourismTwitter_shivkumar07_Instagram
हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा
Adlabs Imagica हे वीकेंडसाठी एक रमणीय ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासह तुम्ही मजा-मस्ती करु शकता.
Photo Credit: imagicaaworld-com
पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून 35 किमी अंतरावर असलेला सिंहगड सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे. ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ला तुम्ही वीकेंडसाठी एक चांगले ठिकाण आहे. विहंगम दृश्ये, हिरव्यागार पर्वतांचे दृश्ये असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी चांगले ठिकाण आहे.
Photo Credit: maha_tourism_Twitter
हे पण वाचा : या रंगाचे कपडे घाला, आयुष्यात होईल भरभराट अन् धनलाभ
पुण्यात फिरण्याच्या ठिकाणांमध्ये शनिवार वाडा हे अनेकांची पहिली पसंती आहे. या ठिकाणी आता संध्याकाळी लाइट अँड साउंड शो चे आयोजन केले जाते. हा शो बघण्यासाठी गर्दी होते. सकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत शनिवार वाड्यात प्रवेश दिला जातो.
Photo Credit: Times Network
ही इमारत 1892 मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी बांधली. या इमारतीत गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा यांचेही काही काळ वास्तव्य होते. सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत या ठिकाणी भेट देऊ शकता.
Photo Credit: Times Network
हे पण वाचा : Vastu Tips: संध्याकाळी चुकूनही करू नका ही कामे
पुण्यात आलो आणि या गणपतीचे गर्शन घेतले नाही अशी माणसं अतिशय दुर्मिळ आहेत. सकाळी 6 ते रात्री 10.30 या वेळेत दर्शन घेणे शक्य आहे.
Photo Credit: Times Network
संग्रहालयाची स्थापना 1998 मध्ये झाली. या ठिकाणी पुण्याच्या कॅन्टॉनमेंटमध्ये असलेल्या या संग्रहालयात प्रामुख्याने कारगिल युद्धाशी संबंधित भरपूर माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध आहे. संग्रहालय सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुले असते.
Photo Credit: Times Network
स्ट्रीट शॉपिंगसाठी तुळशी बाग परिसर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वाजवी दरात अनेक आकर्षक वस्तू खरेदी करणे शक्य आहे.
हे पण वाचा : अंघोळीपूर्वी करा बॉडी मसाज होतील असंख्य फायदे
पुण्यापासून 50 किमी अंतरावर असलेला कामशेत हा परिसर पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे.
Photo Credit: Times Network
निवांत वॉक करण्यासाठी प्रसिद्ध असलेला परिसर. परदेशी पाहुण्यांचे पुण्यातील आवडते ठिकाण.
Photo Credit: Times Network
हे पण वाचा : गरोदरपणात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका
निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर वीकेंड ट्रिपसाठी खूपच खास आहे. येथील नद्या, धबधबे आणि धुक्यात लपलेले शिखरे हे एक सुंदर ठिकाण आहे.
Photo Credit: Mahabaleshwar_maha_tourismTwitter
सातारा जिल्ह्यातील एक छोटे आणि सुंदर असे वाई हे पुण्यापासून साधारणत: 90 किमी अंतरावर आहे. येथील प्राचीन मंदिरे, अप्रतिम वास्तू पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
Photo Credit: Wai_maha_tourismTwitter
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?
भंडारदराभंडारदरा हे ठिकाण पुण्यापासून 162 किमी अंतरावर आहे. यासाठी तुम्हाला इगतपुरीची ट्रेन घ्यावी लागेल तेथून भंडारदरा 45 किमी अंतरावर आहे. येथे अनेक मनमोहक दृश्ये पाहण्यासाठी आहेत. अनेक अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज आहेत.
Photo Credit: Bhandardara Camping_@ignis_fatuus__ Twitter.jpg
माथेरान हे हिल स्टेशन पुण्यापासून 119 किमी अंतरावर आहे. यासाठी तुम्ही पुण्याहून सह्याद्री एक्सप्रेसने नेरळला जाऊ शकता. तेथून 30 मिनिटांवर माथेरान आहे. माथेरानला फिरण्यासाठी विविध पॉईंट आहेत. येथे तुम्ही ट्रेकिंग, माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर, घोडे सवारी करू शकता. तसेच नाईट कॅम्पिंगचाही चांगला पर्याय आहे.
Photo Credit: instagram
राजमाची (84 किमी) पुण्याजवळील मोठ्या संख्येने ट्रेक करण्यायोग्य मराठाकालीन किल्ल्यांपैकी राजमाची हा आणखी एक आहे. पुण्याजवळ या ठिकाणी 1 दिवसाच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.