25 March Dinvishesh : आजच्या दिवशी काय घडलं होतं? जाणून घ्या काय आहेत ऐतिहासिक घटना

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 24, 2023 | 21:44 IST

25 March Dinvishesh : मार्च महिन्यातील आजच्या दिवशी म्हणजेच  25  मार्च रोजी अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटना घडल्या आहेत.  या दिवशी घडलेल्या घटनांमुळे अख्या देशावर परिणाम झाला आहे. आज महान व्यक्तीची जयंती आहे तर काहींची आज पुण्यतिथी आहे.

Dinvishesh : Know what happened today?
Dinvishesh : जाणून घ्या काय घडलं होतं आजच्या दिवशी?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काय आहे आजचे दिनविशेष
  • काय घडलं आजच्या दिवशी
  • लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

25 March Dinvishesh : मार्च महिन्यातील आजच्या दिवशी म्हणजेच  25  मार्च रोजी अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटना घडल्या आहेत.  या दिवशी घडलेल्या घटनांमुळे अख्या देशावर परिणाम झाला आहे. आज महान व्यक्तीची जयंती आहे तर काहींची आज पुण्यतिथी आहे.  कोण-कोणत्या घटना आजच्या दिवशी घडल्या आहेत याची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.... (25 March Dinvishesh : What happened today? Know what are historical events)

अधिक वाचा  :  चैत्र विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या


25 मार्च महिन्यातील महत्वाच्या घटना

 1655 : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
 
1807 : गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

1898 : शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

1929: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

1997 : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे 27 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

 2000 : 17 वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

2013: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

2013 : मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.`

अधिक वाचा  : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश

25 मार्च रोजी  जन्म

1932 : लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 2001)

1933 : शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.

1937 : डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

1947 : इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

1956 : ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

अधिक वाचा  : कोणत्या राशींना मिळेल धनलाभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य


25 मार्च  मृत्यू

1931 : भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1890 )

1940 : आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1867)

1975 : सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.

1991 : जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1907)

1993 : साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1932)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी