27 March World Theatre Day, History And Significance Of World Theatre Day : दुसऱ्या महायुद्धाच्या समारोपानंतर युनेस्कोच्या पाठिंब्याने नॅशनल थिएट्रिकल इन्स्टिट्युट (ITI) ही संस्था स्थापन झाली. या संस्थेने दरवर्षी 27 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 1961 मध्ये झाला. यानंतर 27 मार्च 1962 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा करण्यात आला. आता जगभरातील नाट्यक्षेत्राशी संबंधित सर्व संस्था 27 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा करतात. नाट्यसृष्टीच्या विस्तार आणि विकासाकरिता प्रयत्न करणारे सर्व जण आपल्या नवनव्या कार्यक्रमांचा आणि मोहिमांचा शुभारंभ 27 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय रंगमंच दिनाच्या मुहुर्तावर करणे पसंत करतात.
पहिल्या आंतरराष्ट्रीय रंगमंच दिनाला फ्रान्सच्या जीन मॉरिस यूजीन क्लेमेंट कोक्ट्यू (Jean Maurice Eugène Clément Cocteau) यांनी जगभरातील नाट्यसृष्टीला उद्देशून एक संदेश दिला होता. हा पहिल्या आंतरराष्ट्रीय रंगमंच दिनासाठी दिलेला पहिला संदेश होता. भारतातून गिरीश कर्नाड यांनी 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय रंगमंच दिनासाठी संदेश दिला होता.
सिनेमा हे माध्यम अस्तित्वात येण्याआधी मनोरंजन करणे, जनजागृती करणे, सामाजिक संदेश देणे, प्रबोधन करणे या सर्व उद्देशांना साध्य करण्यासाठी रंगमंचाचा वापर होत होता. आजही कमी जास्त प्रमाणात रंगमंचाचा हे उद्देश साध्य करण्यासाठी वापर होतो. यामुळे रंगमंचाचे मानवी आयुष्यात महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठीच दरवर्षी 27 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा केला जातो.
भारतीय नाट्यकलेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. ऋग्वेदात यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी असे संवाद आढळतात. भरतमुनी यांनी भारतात नाट्यशास्त्र अर्थात नाटकाला शास्त्रीय रुप दिले. यामुळे भारतात नाट्यसृष्टी, नाटकांतून काम करणारे कलाकार, सहकलाकार या सर्वांना पहिल्यापासूनच महत्त्व आणि मान मिळत आहे. पण युनेस्कोचा सदस्य असल्यामुळे भारताने 27 मार्च या दिवशी औपचारिक स्वरुपात आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
भरतमुनींनी नाट्यशास्त्राची निर्मिती ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असे सांगतात. भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आढळते. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले आहे. भरतमुनींच्या नावावरूनच पुढे देशाचे नाव भारत झाले असेही सांगतात. नाट्यशास्त्र हा ग्रंथ अभ्यासल्यास ईसवी सनापूर्वीच भारतात नाट्यशास्त्र प्रगतीशील अवस्थेत होते असे म्हणता येईल. ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक, आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती आहे. सोबतच नृत्यशास्त्रावरही ग्रंथात सविस्तर माहिती आढळते. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा, वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो. ग्रंथात नमूद रंगमंचाचे आणि नाट्यगृहाचे वर्णन किंवा आराखडा आपण आजही वापरतो. नाटकात काय वर्ज्य आहे याबाबतही भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नमूद केले आहे.
नाट्यशास्त्राचा अतिप्राचीन इतिहास असूनही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा भाग असल्यामुळे भारताने दरवर्षी 27 मार्च या दिवशी औपचारिक स्वरुपात आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतात 27 मार्च या दिवशी औपचारिक स्वरुपात आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन साजरा केला जात आहे.
जन्मल्यापासून या चिमुकलीची जगभर चर्चा
बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत यूट्युबर