6 december dr babasaheb ambedkar mahaparinirvan din bhashan marathi, mahaparinirvan din speech in marathi PDF
सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे ही नम्र विनंती.
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तत्वाची,
तु जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणूसकीची....
तु देव नव्हतास, देवदूतही नव्हतास "
तु मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास.....
अशा या महासूर्याला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करतो / करते.
मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दालतांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वत: च्या अलौकिक विद्धत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा, अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चढनापरिस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्नू ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते. असे डॉ. बाबासाहेब अबिडकर यांना वंदन करतो.
महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले.
विद्यार्थी दशेपासूनच जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तेथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापुर यांनी त्यांना या देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो, इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रीमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरी ते मंत्रिमंडळात होते. बाबासाहेबांनी अनेक सभा गाजावल्या. म्हणजे ते उत्तम वक्ते देखील होते. त्यांची विद्धता पाहूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडून भारताची राज्यघटना लिहून घेतली. या महामानवाचे महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ तत्वज्ञ, समाजसुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे राजकारणी शिल्पकार होते. त्यांनी दलित चळवळ उभी केली. त्या काळात दलित लोकाना अस्पृश्य समजले जायचे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता इतकेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता अशा लोकाना तुच्छतेची वागणूक दिली जायची. डॉ. आंबेडकरानी जातीभेद, अन्यायाविरूद लढा दिला. नागरिकांना त्यांचे मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला, त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडीलांचे नाव 'रामजी' व आईचे नाव 'भीमाबाई' असे होते. डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव 'भीमराव रामजी आंबेडकर' असे होते. ते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते. त्यांना शाळेत प्रवेश देण्यास नकार मिळाला कारण ते दलित समाजाचे होते वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावे लागले ते अत्यंत अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांच्या बालपणी त्यांना मिळालेली तुच्छतेची वागणूक ही अन्याया विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा. सत्याग्रह, संविधान अशी महान कार्ये केली. ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा महामानवास विनम्र अभिवादन!
आले किती गेले किती.
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही.
माझ्या भीमाचा दरारा.
१. नमस्कार, सन्मानयीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन - वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीतो
२. सर्वप्रथम, सर्वांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.
४.त्यांचा जन्म १४ एप्रिल १८७१ रोजी मध्यप्रदेश -तील महू येथे झाला.
५. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते.
६. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर, अर्थतज्ञ, समाज सुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते.
७. दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता...
८. बाबासाहेब आंबेडकर त्याकाळी देशातील उच्च शिक्षित व्यक्तीपैकी एक होते, आणि ते त्यांच्या विद्यार्थीदशेत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणासाठी केलेली धडपड अनेकांना प्रेरित करते.
९. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला..
१०. ६ डिसेंबर १९५६ मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले, भारत सरकारने त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न'। या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले..
धन्यवाद !
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिक साली झाला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांच्या वडीलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुशार वू महत्वाकांक्षी होते. ते भारतीय न्यायशास्त्रत, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते
डॉ. बाबासाहेब लहान असताना त्यांना वर्गात बसू दिले जायचे नाही. दारात बसून त्यांनी आपले शिक्षण घेतले दलित समाजात जन्माला आल्याने त्यांच्या सोबत भेदभाव केला जात होता. बाबासाहेब यांच्या शाळेय जीवनात १८ तास अभ्यास करायचे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होत. हिंदू कोड बीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरचा वारसा हक दिला. तसेच महिलांना पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार दिला गेला.
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा"
हा मूलमंत्र त्यांनी दिला. त्या काळी समाजात अस्पृश्यता, जातीभेद खूप मोठया प्रमाणात होता. त्याविरुद्ध त्यांनी चळवळ उभी केली. दलित लोकांनाही समान वागणूक मिळावी यासाठी लढा दिला. त्यांना 'भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या महान व्यक्तीचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर (१९५७) रोजी साजरा केला जातो.
आले किती गेले किती.
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही.
माझ्या भीमाचा दरारा.
...............................
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तत्वाची,
तु जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणूसकीची....
तु देव नव्हतास, देवदूतही नव्हतास "
तु मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास.....
(ही संकलित माहिती आहे. भाषण करण्याआधी एकदा भाषणाचा अंतिम मसुदा आपल्या शिक्षक, मार्गदर्शक, वरिष्ठ यांच्याकडून मंजूर करून घेणे हिताचे)