नातीच्या शिक्षणासाठी विकले होते घर,व्हायरल झाली होती स्टोरी, आता मिळाले इतके लाख डोनेशन

लाइफफंडा
Updated Feb 25, 2021 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईचे वृद्ध रिक्षा् चालक देसराज यांची गोष्ट भावनिक करणारी आहे. व्हायरल झाल्यानंतर लोकांनी केली मदत. २४ लाख रूपयांची दिली देणगी.

A man who sold vehicle for child's Education, get donation
देसराज  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • नातीच्या शिक्षणासाठी विकले घर, गोष्ट झाली व्हायरल
  • लोकांनी केली मोठी मदत, तब्बल २४ लाख रूपयांची मिळाली देणगी
  • रिक्षा चालवून घेतली कुटुंबाची जबाबदारी

नवी दिल्ली:  नुकतीच एका वृद्ध रिक्षाचालकाची गोष्ट व्हायरल झाली होती. देसराज यांची गोष्ट खूप हृदय पिळवटून टाकणारी होती.  त्यानंतर लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आणि आता तर त्यांना २४ लाखांची देणगी मिळाली आहे. देसराज यांनी आपल्या नातीच्या शिक्षणासाठी  आपले घरसुद्धा विकले होते आणि ते स्वतः त्यांच्या रिक्षात राहायचे. Humans of Bombay या इन्स्टा अकाऊंटवर शेअर झालेली ही त्यांची कथा भावनिक असली तरीही त्यात एक सकारात्मक आशावाद दिसतो.

लोकांच्या मदतीने आता त्यांना २४ लाख रूपये मिळाले आहेत. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात २४ लाखांचा चेक आहे आणि ते सर्वांचे आभार मानत आहेत. 

रिक्षा चालवून घेतली पूर्ण कुटुंबाची जबाबदारी

देसराजने आपल्या कथेत दोन्ही मुलांना गमावल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या बायका लेकरांची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यांची नात ९वीत होती, तीने त्यांना विचारले होते, 'आजोबा मला शाळा सोडावी लागेल काय?' तेव्हा देसराज यांनी असे काही होणार नाही असे आश्वासन तिला दिले होते. त्यानंतर त्यांनी खूप कष्ट घ्यायला सुरूवात केली. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत रिक्षा चालवून त्यांना महिन्याला १० हजार रूपये कमाई व्हायची. त्यात ते  नातवंडांच्या फिससाठी  ६ हजार रुपये वापरत. उरलेल्या ४ हजारात सात लोकांचे कुटूंब चालत होते.  

नातीसाठी विकले होते घर 

नातीला १२वीत ८० % मिळाल्यावर त्यांनी दिवसभर सर्वांना मोफत सेवा दिली. त्यांच्या नातीने बी एडसाठी दिल्लीला जाण्यासाठी विचारल्यावर आपल्याला हे झेपणारे नाही हे माहिती असूनही त्यांनी या समस्येतून मार्ग काढला. ते म्हणतात की मला कोणत्याही परिस्थितित तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यासाठी मी घर विकले आणि तिची फीस भरली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी