नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्राचा (Jyotish Shastra) अविभाज्य भाग असलेल्या सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik Shastra) शरीरावर असलेल्या तीळला (Moles) विशेष महत्त्व आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असलेले तीळ (Moles On Body) वेगवेगळे संकेत देतात. कपाळाच्या वेगवेगळ्या भागावर तीळचा अर्थही वेगवेगळा असतो असे सामुद्रिक शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रात तीळविषयी काय म्हटले आहे
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो. त्या महिला आत्मविश्वासाने परीपूर्ण असतात. अशा महिला कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:चा मार्ग निर्माण करतात आणि यश प्राप्त करतात.
ज्या लोकांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो असे लोक खूप बुद्धिमान असतात. त्यांना आयुष्यात फार लवकर यश प्राप्त होते. या लोकांना यश मिळवणे फारसे अवघड वाटत नाही. या लोकांना सर्व कौटुंबिक सुख मिळते. परंतु जीवनात खरे प्रेम कधीच मिळत नाही. या लोकांना फसवणूक होण्याची भीती वाटते.
ज्या महिलेच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर तीळ असतो तो तीळ सौभाग्याचं प्रतीक मानलो जातो. या महिला खूप भाग्यवान असतात. ज्या घरात या महिलांचा विवाह होतो ते घर धन-धान्याने पूर्ण राहते. पैशांच्या बाबतीत देखील या महिला भाग्यवान असतात.
कपाळाच्या वरच्या बाजूला तीळ असलेल्या लोकांना दैवी शक्ती प्राप्त होते. या लोकांना खूप मित्र असतात. या लोकांना सर्वाधिक कौटुंबिक सुख मिळते. हे लोक करिअरमध्ये उत्तम काम करतात. मात्र लग्नासाठी या लोकांना बराच वेळ वाट पाहावी लागते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)