LPG Checking Trick: ओला कपडा सांगेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे; जाणून घ्या सोपी पद्धत

लाइफफंडा
Updated May 12, 2022 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

 LPG Checking Trick । स्वादिष्ट पदार्थ खाण्याची तयारी करत असाल आणि अचानक गॅस संपला तर मन भरकटते तसेच चिडचिडही होते. खासकरून रात्रीचे जेवण बनवताना असा प्रकार झाला तर अनेकवेळा बिस्किटे, फराळ खाऊन रात्र काढावी लागते.

A wet cloth will tell you how much gas is left in the cylinder
ओला कपडा सांगेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओला कपडा सांगेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे.
  • त्यासाठी सिलेंडरला एक ओले कापड गुंडाळा.
  • बारकाईने पाहिल्यास सिलेंडरचा काही भाग कोरडा तर काही भाग ओला असल्याचे दिसून येईल.

 LPG Checking Trick । मुंबई : स्वादिष्ट पदार्थ खाण्याची तयारी करत असाल आणि अचानक गॅस संपला तर मन भरकटते तसेच चिडचिडही होते. खासकरून रात्रीचे जेवण बनवताना असा प्रकार झाला तर अनेकवेळा बिस्किटे, फराळ खाऊन रात्र काढावी लागते. ही स्टोरी कोणा एकाच्या घराची नाही तर सर्वांच्याच घरांमध्ये कधीतरी अशी परिस्थिती उद्भवत असते. मात्र आता यावर रामबाण उपाय म्हणजे एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या माध्यमातून सिलेंडर उचलून किंवा गॅसची धगधगती ज्वाला पाहून तो आणखी किती दिवस चालेल याचा अंदाज लावता येईल. (A wet cloth will tell you how much gas is left in the cylinder). 

अधिक वाचा : कचरा वाटणाऱ्या बुटांची किंमत आहे ४८ हजार

गॅसला एक ओले कापड गुंडाळा

दरम्यान, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण आज काही सोप्या पद्धतीवर भाष्य करणार आहोत, ज्यासाठी कोणतीही रक्कम मोजायची नाही. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, यासाठी गॅस सिलेंडरला भिजवून संपूर्ण सिलेंडरभोवती लावा आणि सिलेंडर ओला झाल्यानंतर ते कापड काढा. 

आता बारकाईने पाहिल्यास सिलेंडरचा काही भाग कोरडा तर काही भाग ओला असल्याचे दिसून येईल. म्हणजेच कोरडा भाग हा असा भाग आहे ज्यामध्ये गॅस शिल्लक नाही. या पद्धतीने सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तुम्हाला सहजरित्या कळू शकते. यासाठी दर दोन-तीन दिवसांनी एकदा या ट्रिकद्वारे गॅस ओळखून तुम्ही वेळेत सिलेंडर बुक करू शकता.

रिकामा भाग द्रव वायूपेक्षा गरम असतो

रिकामा भाग तुलनेने भरलेल्या द्रव वायूपेक्षा जास्त गरम असतो. अशा स्थितीत ओल्या कपड्याच्या संपर्कात येताच संपूर्ण सिलेंडर ओला होतो, पण रिकामा भाग लवकर सुकायला लागतो. दरम्यान एक वेळ अशी येते जेव्हा सिलेंडरवर स्पष्टपणे दिसून येते की कोरडे झाल्यानंतरही किती भाग ओला आहे. अशा प्रकारे गॅस किती प्रमाणात शिल्लक आहे याचा अंदाज लावता येतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी