Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात, वाद निर्माण होतील अशा गोष्टी पत्नी आणि मुलांसमोर करू नका, जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 12, 2021 | 12:41 IST

Chanakya Niti :  चाणक्य नीतीनुसार बोलताना (Talk) शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. फटक्यापेक्षा शब्दांचा मारा खूप त्रास देणारा असतो.

Chanakya Niti
Chanakya Niti : पत्नी आणि मुलांसमोर करू नका 'या' गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलांवर पालकांच्या बोलण्याचा, भाषेचा आणि सवयींचा सर्वाधिक परिणाम होतो.
  • कठोर आणि मनाला ठेच लागणाऱ्या गोष्टी बोलल्याने आत्मविश्वास कमी होत असतो.
  • घरातील वातावरण जितके चांगले असेल तितके अधिक सकारात्मक ऊर्जा असेल.

Chanakya Niti : नवी दिल्ली :  चाणक्य नीतीनुसार बोलताना (Talk) शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. फटक्यापेक्षा शब्दांचा मारा खूप त्रास देणारा असतो. म्हणून, संभाषणादरम्यान कोणते शब्द निवडले पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे. पत्नी (wife) आणि मुलांसमोर कधीही चुकीचे, अव्यावसायिक (unprofessional) शब्द आणि आचरण करू नये. यामुळे प्रतिष्ठा दुखावते आणि चुकीचा संदेश जातो.

मुलांना सर्वोत्तम वागणूक ठेवा

चाणक्य नीती सांगते की, मुलांवर पालकांच्या बोलण्याचा, भाषेचा आणि सवयींचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यावी. मुलांसमोर कधीही चुकीची आणि अयोग्य भाषा इत्यादी वापरू नये. त्याचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. त्यांच्या जीवनावरही या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.

मनाला ठेच पोहचेल असे बोलू नका

चाणक्य नीती सांगते की, पत्नीसोबत अशा गोष्टी कधीही करू नयेत, ज्यामुळे तिच्या मनाला ठेच पोहचेल. तुमच्या पत्नीचे मनोबल वाढवा. कठोर आणि मनाला ठेच लागणाऱ्या गोष्टी बोलल्याने आत्मविश्वास कमी होत असतो. जर आपण मनाला त्रास होईल असं बोलत असू तर तणाव आणि वाद निर्माण होत असतात. जीवनातील मतभेद आणि तणावामुळे यशाचा वेग मंदावतो. त्यामुळे याची काळजी घेतली पाहिजे.

घरातील वातावरण चांगले ठेवा

चाणक्य नीतीनुसार घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घरातील वातावरण जितके चांगले असेल तितके अधिक सकारात्मक ऊर्जा असेल. घरामध्ये शिस्त आणि मर्यादा पाळा. राग आणि अहंकारापासून दूर राहून स्वभावात नम्रता आणि भाषेत गोडवा असावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी