प्रेमात ब्रेकअप करणं टाळायचंय, भांडतांना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Breakups: भांडण तर प्रत्येक जोडप्यामध्ये होत असतं. मात्र महत्त्वाचं हे आहे की, आपण भांडण सोडवतो कसं.एकमेकांचे उणे-दुणे काढून पूर्ण दिवस त्याचा पाढा वाचणं समुजतदार पणाचं लक्षण नाही.जाणून घ्या ब्रेकअप कसं टाळायचं

Couple Fight (Shutterstock)
प्रेमात ब्रेकअप करणं टाळायचंय, भांडतांना 'हे' लक्षात ठेवा 

थोडं पण कामाचं

  • नातं म्हटलं, प्रेम म्हटलं की भांडण हे होतंच, पण ते यशस्वीपणे दूर करता यायला हवं.
  • भांडतांना मनात बऱ्याच गोष्टी येतात, पण ते सर्व बोलणं आणि करणं टाळलं पाहिजे
  • भांडणानंतर एकमेकांच्या चुका काढत बसू नये.

Love and Breakups: प्रेम म्हटलं की त्यात भांडण हे आलंय. (LOVE) पण प्रेमातील भांडणं जेव्हा वाढतात तेव्हा नातं संकटात येतं. कधी-कधी आपण रागात असतो आणि नात्याबाबत विचार करत नाही, ज्यात दोघंही नातं तोडून बसतात.(Breakup)

आपण विचार पण करू शकत नाही की, नातं कधी कुठलं वळण घेईल. आपल्याला नातं टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

हे खरं आहे की, भांडत असतांना आपल्या भावनांवरील ताबा सुटतो. आपण नको-नको ते बोलून बसतो. मात्र भांडणानंतर डोकं शांत ठेवत विचार करायला हवा की, एव्हढ्या लहान गोष्टीवरून आपण भांडलो, थेट नातं तोडणं योग्य ठरेल का? जोपर्यंत आपण ब्रेकअप करायचा विचार करत नाही, तोपर्यंत कुठलंही भांडण (Fight) ते नातं तोडू शकत नाही. म्हणून अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही गोष्टी जाणून घ्या.

इथं आम्ही काही गोष्टी सांगतोय ज्या आपण आपल्या पार्टनरसोबत कुठलंही भांडण संपविण्यासाठी बोलू शकता-

चुकांची लिस्ट बनवावी

भांडणानंतर नेहमी पार्टनर एकमेकांच्या चुका शोधणं सुरू करतात. जर आपण पण असं करत असाल. तर तसं करणं बंद करा, पण लक्षात ठेवा की, एका चांगल्या नात्यात समोरच्या व्यक्तीवर बोट उचलणं योग्य नाही. आपल्या मित्रांवर टीका करणं एका चांगल्या मित्राची ओळख नसते. थोडा वेळ शांत राहा आणि आपल्या डोक्याचा वापर करा.

एक-दुसऱ्याला जबाबदार ठरवू नका

अनेकदा भांडण करतांना आपण रागाच्या भरात पार्टनर म्हणतो की, यात तुमची चूक झाली किंवा तुझ्यासोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली. भांडणात जोडपं एकमेकांना जबाबदार धरतात. अशात गरजेचं आहे की, आपण कितीही रागात असाल मात्र एकमेकांवर आरोप लावू नये.

प्रेम जिंका

आपल्याला भांडणात जिंकायचं असेल तर प्रेम जिंका. जर आपण डोक्यानं विचार केला तर आपलं नातं तुटण्यापासून वाचू शकतं. जर वारंवार होत असलेल्या वाद-विवादात आपण स्वत:ला वरचढ ठेवत असाल, तर हे लक्षात ठेवा आपल्या पार्टनरचं प्रेम जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी भांडण बंद करून प्रेमानं सामोपचारानं मार्ग काढा.

मला रागवायला नको होतं

जर आपण रात्री भांडतांना जास्तच रागावले असाल तर आपल्याला हे जाणवलं पाहिजे हे करणं चुकीचं आहे. यावर आपण पुन्हा बोलू शकता आणि आपल्या पार्टनरला मी रागवायला नको होतं, असं म्हणून आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करू शकता. तसंच भविष्यात आपला राग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्नही करा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी