Ahilyabai Holkar jayanit 2022 Massages in Marathi : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा संदेश 

Ahilyabai Holkar jayanit 2022 Massages in Marathi : टाइम्स नाऊच्या वाचकांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा. या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यांच्यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.

Ahilyabai Holkar jayanit 2022 Massages in Marathi
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा संदेश  
थोडं पण कामाचं
  • टाइम्स नाऊच्या वाचकांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा.
  • या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यांच्यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
  • अहिल्याबाईंनी पती निधनानंतर त्याच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय अंमलात आणला

नवी दिल्ली: Punyashlok Ahilyabai Holkar टाइम्स नाऊच्या वाचकांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा. या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यांच्यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. Punyashlok Ahilyabai Holkar Jayanti Marathi Wishes Punyashlok Ahilyabai Holkar Birth Anniversary Marathi Wishes Share on Whatsapp Facebook Instagram Twiiter Telegram

मालवा (माळवा) प्रांताच्या जहागीरदार महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात संपूर्ण मालवा (माळवा) प्रांताची वेगाने प्रगती झाली. पाण्याच्या नियोजनासाठी अहिल्याबाईंच्या कार्यकाळात मोठे काम झाले. तलाव, विहिरी, घाट, नदीला योग्य प्रकारे बांध घालणे अशी अनेक कामे झाली. उत्तम रस्ते, भक्कम किल्ले, दर्जेदार आरोग्य सुविधांची निर्मिती तसेच कला-संस्कृतीच्या विकासाला चालना देणे अशी कामेही अहिल्याबाईंच्या कार्यकाळात वेगाने झाली. 

अहिल्याबाईंनी देणग्या देऊन मालवा (माळवा) प्रांतात तसेच भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा यांचेही मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले. इंदूर या खेड्याचे विकसित शहरात रुपांतर करण्याचे काम त्यांच्याच काळात झाले.

पडदा पद्धतीला विरोध आणि दररोज दरबार भरवून जनतेचे म्हणणे ऐकून तातडीने प्रश्न सोडवणे ही अहिल्याबाईंच्या कामाची खास पद्धत होती. त्यांनी पती निधनानंतर त्याच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय प्रांतात अंमलात आणला. विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली.

हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठे निर्णय घेतले आणि अंमलात आणले. संपूर्ण प्रांतात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. यामुळे अहिल्याबाईंविषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी