Food Culture in Mughal Empire : मांसाहारापेक्षा शाकाहारावर भर होता मोगल सम्रांटाचा, औरंगजेबामुळे फळांचा पडला प्रघात 

Food Culture in Mughal Empire : जेव्हा जेव्हा मोगल साम्राज्याचा विषय निघतो तेव्हा त्यांचे राजकारण, साम्राज्य, संस्कृती, जनानखाना आणि खाद्यसंस्कृतीचा उल्लेख होतो. मोगलांना खाण्यात फक्त मांसाहारी जेवण असायचे असा समज आहे. परंतु इतिहासात याचे संदर्भ शोधल्यास वेगळेच सत्य समोर येतं. अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत अनेक बादशहांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडायच्या. बादशहा अकबर एक चांगला शिकारी होता, परंतु त्याला मांस खाण्यात फार रस नव्हता.

auragzeb and akbar
मांसाहारापेक्षा शाकाहारावर भर होता मोगल सम्रांटाचा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जेव्हा जेव्हा मोगल साम्राज्याचा विषय निघतो तेव्हा त्यांचे राजकारण, साम्राज्य, संस्कृती, जनानखाना आणि खाद्यसंस्कृतीचा उल्लेख होतो.
  • अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत अनेक बादशहांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडायच्या
  • बादशहा अकबर एक चांगला शिकारी होता, परंतु त्याला मांस खाण्यात फार रस नव्हता.

Food Culture in Mughal Empire : जेव्हा जेव्हा मोगल साम्राज्याचा विषय निघतो तेव्हा त्यांचे राजकारण, साम्राज्य, संस्कृती, जनानखाना आणि खाद्यसंस्कृतीचा उल्लेख होतो. मोगलांना खाण्यात फक्त मांसाहारी जेवण असायचे असा समज आहे. परंतु इतिहासात याचे संदर्भ शोधल्यास वेगळेच सत्य समोर येतं. अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत अनेक बादशहांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडायच्या. बादशहा अकबर एक चांगला शिकारी होता, परंतु त्याला मांस खाण्यात फार रस नव्हता. शरीराला ऊर्जा मिळावी तेवढे मांस अकबर खायचा परंतु अकबराच कल मांसाहारपेक्षा शाकाहारी अन्नाकडेच होता. (akbar to aurangazeb follow vegetarian food and lifestyle in mughal empire read in marathi )

अधिक वाचा :  Tasteless Candy: कंपनीने बनवली कुठलीही चव नसलेली टॉफी, कारण आहे मजेशीर


मोगल सम्राटांचा मांसाहारापासून दुरावा

इतिहासकारांनी नमूद केल्यानुसार मोगल सम्राट सुरूवातीच्या काळात मांसाहार करणे टाळायचे. मोगल सम्राट दर शुक्रवारी आणि रविवारी मांसाहार आवर्जून टाळायचे. त्यानंतर मोगल सम्राट आणि मासांहारापासून दुरावा वाढत गेला. महिन्याची पहिली तारीख आणि संपूर्ण मार्च महिन्यात मोगल दरबारात शाकाहारी स्वयंपाक असायचा. शाकाहारीचीही परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गेली. मोगल सम्रांटाच्या दिवसाच्या जेवणाची सुरूवात दही भाताने व्हायची, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. 

अधिक वाचा : Vastu Tips: वास्तुशी संबंधित' हे' 5 उपाय केल्यास घरात येते समृद्धी, आर्थिक समस्या दूर होतात

तीन भागात विभागलेले स्वयंपाकघर

मोगल साम्राज्यातील खाण्यापिण्यावर अकबरचा जवळचा सहकारी अबुल फजलने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. अबुल फजलने आईन-ए-अकबरीमध्ये लिहिले आहे की मोगलांचे स्वयंपाकघर तीन भागांत विभागलेले होते. एका भागात मांसाहार पूर्ण वर्ज्य होता. दुसर्‍या विभागात फक्त मांसाहारी पदार्थच बनवले जायचे. अकबर बादशहाला डाळ, भाज्या आणि पुलाव आवडायचा. बादशहा अकबराला भाज्या आवडतात म्हणून दररोज स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जायच्या. जास्त आणि चांगल्या भाज्या पिकवाव्या म्हणून शेतकर्‍यांचा महसूलही माफ करण्यात आला होता.  दुसर्‍या विभागात मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ एकत्र बनवले जायचे परंतु त्यात फार मसाल्यांचा वापर होत नसे. तिसर्‍या प्रकारच्या स्वयंपाकघरात जास्त मासांहारी आणि तेल, तूप आणि मसाल्यांचा वापर व्हायचा. 

अधिक वाचा : Anxiety Symptoms: सतत चिंतातूर असण्याामागची ‘ही’ असतात कारणं, ओळखा आणि बाहेर पडा

औरंगजेब एक पाऊल पुढे

शाकाहारी भोजनाच्या बाबतीत औरंगजेब आपल्या पूर्वजांच्या एक पाऊल पुढे होता. औरंगजेब खवय्या होता, परंतु त्याने लवकर मासांहार सोडला. त्यामुळे औरंगजेबाच्या ताटात साधे पदार्थ असायचे. शाही स्वयंपाकघरात औरंगजेबसाठी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जायच्या. औरंगजेबाने आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात सुलेमान या आचार्‍याचा उल्लेख केला आहे. सुलेमान औरंगजेबासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी बनवून घालायचा. औरंगजेबाने पत्रात आपल्या मुलाला या आचार्‍याला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले आहे. 

अधिक वाचा : Workplace challenge: करिअरमध्ये प्रगती करताना महिलांपुढं असतात ‘ही’ आव्हानं, वाचा सविस्तर

 
ताज्या फळांचा चाहता औरंगजेब

औरंगजेबाला ताजी फळं फार आवडायची. त्यात आंबा औरंगजेबाला जीव की प्राण होता. मोगल स्वयंपाकघरात शाकाहारी पदार्थांना प्राधान्य होते, म्हणूनच मोगळकाळात गव्हाच्या पीठाचे कबाब, चण्याच्या डाळीचा पुलाव अशा पदार्थांचा समावेश होता. आज स्वयंपाकात पनीर कोफ्ते आणि पदार्थांमध्ये होत असलेला फळांचा वापर औरंगजेबामुळे सुरू झालेला प्रघात आहे असा दावा काही इतिहासकार करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी