Akshaya Tritiya 2023 Offers: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करा, मोफत सोन्याच्या नाण्याबरोबर विशेष सूट मिळवा

लाइफफंडा
Updated Apr 16, 2023 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshaya Tritiya 2023 Golden Offers: या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा दागिने खरेदी करण्यापूर्वी या विशेष ऑफरबद्दल जाणून घ्या. 

मोफत सोन्याचे नाणे मिळवा
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बड्या ज्वेलर्सनी जाहीर केले ऑफर्स   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अक्षय तृतीयेचा दिवस जवळ आला की सोन्याची मागणी वाढते
  • सध्या सोन्याचा भाव गगनाला जरी भिडला असला तरी, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने अनेक मोठ्या ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर (अक्षय तृतीया 2023 गोल्ड डिस्काउंट ऑफर्स) आणल्या आहेत
  • अक्षय्य तृतीयेला मोफत सोन्याचे नाणे कसे मिळवायचे ते जाणून घ्या

Akshaya Tritiya 2023 Golden Offers: अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आता काही दिवसांवर आला आहे. यंदा 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या मुहूर्ताला सोने खरेदी केल्याने घरात सोन्याची भरभराट होते अशी धारणा आहे, त्यामुळेच या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. (akshaya tritiya 2023 gold offers how to buy gold jewelery and get free gold coin)

अक्षय तृतीयेचा दिवस जवळ आला की सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे, या दिवसांत सोन्याच्या दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. या दिवशी लोक सोन्याच्या दागिन्यांबरोबरच इतर गोष्टींची देखील खरेदी करतात, परंतु अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी सर्वाधिक होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्याला आपण संपत्ती मानतो. म्हणूनच बहुतांश लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणे शुभ मानतात. 

अधिक वाचा : ​मे महिन्याच्या सुट्टीसाठी स्वस्त आणि मस्त टूरिस्ट डेस्टीनेशन

तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोन्याचा भाव गगनाला जरी भिडला असला तरी, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने अनेक मोठ्या ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर (अक्षय तृतीया 2023 गोल्ड डिस्काउंट ऑफर्स) आणल्या आहेत. यापैकी काही ज्वेलर्सनी सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर बंपर डिस्काउंट जाहीर केले आहेत, तर कोणी सोन्याच्या खरेदीवर मोफत सोन्याचे नाणे देणार आहे. त्यामुळे तुम्ही यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची नाणी, बिस्किट किंवा दागिने खरेदी करणार असाल तर या आकर्षक ऑफर आणि सवलती जाणून घेणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल. 

अक्षय्य तृतीयेला मोफत सोन्याचे नाणे कसे मिळवायचे ते जाणून घ्या

मलबार गोल्ड अँड डायमंड कडून विशेष ऑफर (Malabar Gold and Diamonds Akshaya Tritiya 2023 Offers) देण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने, ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर  50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच 30,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने खरेदी केल्यास तुम्हाला 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे मोफत दिले जाईल. 

अधिक वाचा : आमदारांनी चक्क वडिलांनाच केली धक्काबुक्की

सोन्याच्या दागिने मेकींगवर भरघोस सूट

इतकेच नव्हे तर टाटाचा ज्वेलरी ब्रँड तनिष्क (Tanishq Akshaya Tritiya 2023 Offers) ग्राहकांना अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दगिन्यांवर 25% पर्यंत भरघोस सूट देत आहे. तुम्ही 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. त्याच वेळी, PC चंद्र ज्वेलर्स अक्षय्य तृतीया (PC Chandra Jewellers Akshaya Tritiya 2023 Offers) दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर 15 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरद्वारे तुम्ही 15 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत स्वस्त दरात सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. ही ऑफर 30 एप्रिल पर्यंत वैध असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी