Hello history : टेलिफोनचा शोध लावणार्‍य ग्रॅहम बेलमुळे नव्हे, तर या शास्त्रज्ञामुळे आपण फोनवर बोलतो हेलो

नुकतंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी सरकारी कर्मचार्‍यांना फोनवर हेलो बोलण्याऐवजी वंदे मातरम म्हणा असे आदेश दिले आहेत. या निर्णयाला विरोध होत आहे. जे लोक विरोध करत आहेत त्यांचे आम्ही मतपरिवर्तन करू अशी प्रतिक्रिया मुनंगटीवार यांनी दिली आहे. परंतु जेव्हा मोबाईल नव्हते आणि टेलिफोनचा शोध लागला होता तेव्हापासून लोग हेलो बोलून फोनवर संवाद साधतात.

Alexander Graham Bell
ग्रॅहम बेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकतंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी सरकारी कर्मचार्‍यांना फोनवर हेलो बोलण्याऐवजी वंदे मातरम म्हणा असे आदेश दिले आहेत.
  • जेव्हा मोबाईल नव्हते आणि टेलिफोनचा शोध लागला होता तेव्हापासून लोग हेलो बोलून फोनवर संवाद साधतात.
  • जाणून घेऊया फोनवर  हेलो बोलण्याची प्रथा कुणी सुरू केली.

History of Hello : मुंबई : नुकतंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी सरकारी कर्मचार्‍यांना फोनवर हेलो बोलण्याऐवजी वंदे मातरम म्हणा असे आदेश दिले आहेत. या निर्णयाला विरोध होत आहे. जे लोक विरोध करत आहेत त्यांचे आम्ही मतपरिवर्तन करू अशी प्रतिक्रिया मुनंगटीवार यांनी दिली आहे. परंतु जेव्हा मोबाईल नव्हते आणि टेलिफोनचा शोध लागला होता तेव्हापासून लोग हेलो बोलून फोनवर संवाद साधतात. आता हातात फोन आला तरी आपले हेलो बोलण्याची सवय गेली नाही. जाणून घेऊया फोनवर  हेलो बोलण्याची प्रथा कुणी सुरू केली. (Alexander Graham Bell invented telephone but but speaking hello started by scientist thomas alva edison)

अधिक वाचा : Knotting Tie Well : टाय बांधताना चुकूनही ‘हे’ करू नका, चांगला लूकही होईल खराब

Hello चा इतिहास

ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार Hello शब्द जर्मन शब्द हालापासून बनला आहे. हा शब्द फ्रेंच शब्द होलापासून आला आहे आणि होला म्हणजे कसे आहात ? काळानुरुप या शब्दाचा अर्थही बदलत गेला. इंग्रजी कवी चॉसर या १३०० च्या काळात हा शब्द हालो बनला होता. त्यानंतर शेक्सपिअरच्या काळात या शब्दाचे रुपांतर हालू असे झाले. त्यानंतर या शब्दाचे स्वरूप बदलतच गेले.

अधिक वाचा : Self Dependant Child : ‘या’ वयानंतर मुलांना शिकवा 5 कामं, अनेक प्रश्न सुटतील चुटकीसरशी

ग्रॅहम बेलने लावला शोध

ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. अनेक लोकांना असे वाटते की ग्रॅहम बेलने पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्याने हेलो हा शब्द उच्चारला. असेही सांगितले जाते की ग्रॅहम बेलने आपली प्रेयसी मार्गारेट हेलोला फोन केला. तिचे नाव हेलो असल्याने ग्रॅहम बेलने पहिला शब्द हेलो उच्चारला होता. परंतु या कथेत काही तथ्य नाही. कारण ग्रॅहम बेलच्या प्रेयसीचे नाव मेबेल हार्वड होते. ग्रॅहम मेबेलशी नंतर लग्नही केले होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर ग्रॅहम बेलने आपल्या एका असिस्टंटला फोन लावला आणि Ahoy शब्द म्हणाला. तेव्हा फोन केल्यावर Ahoy शब्दच उच्चारला जात होता. तेव्हा लोकांच्या तोंडीही हाच शब्द रुढ झाला.

अधिक वाचा : Mixer Blade : मिक्सरच्या पात्यांची धार कमी झालीय? नो टेन्शन! करा हे घरगुती उपाय

हेलोची सुरूवात

लिखित इतिहासात १८८३ साली पहिल्यांदा हेलो शब्दाचा वापर झाला. १८८७ साली थॉमस अल्वा एडिसनने पहिल्यांदा फोनवर हेलो बोलण्यास सुरूवात केली. एडिसनकडे जेव्हा फोन आला तेव्हा त्याला Ahoy हा शब्द आवडला नाही. म्हणून थॉमस एडिसनकडे फोनवर हेलो बोलण्याचे श्रेय जातें. १८७७ साली थॉमस एडिसनने सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिटिंग टेलिग्राफ कंपनीकला पत्र लिहून फोन केल्यास हेलो बोलावे अशी विनंती केली होती. म्हणून आजही लँडलाईन असो व्हा फोन, व्हॉईस कॉल असो वा व्हिडीओ कॉल, लोक हेलो बोलून संवादाला सुरूवात करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी