एअरपोर्टवर आलिया- अनुष्काची एकच बॅग, किंमत ऐकून बसेल धक्का

लाइफफंडा
Updated May 11, 2019 | 21:17 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Anuskha and alia airport look: एअरपोर्टवर एक सारख्या बॅग घेतलेल्या बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा स्पॉट करण्यात आलं. दोघींची सुंदर बॅग खूपच महाग आहे. या बॅगची किंमत ऐकून तुम्हांला धक्काच बसेल.

Anushka sharma and alia bhatt
एअरपोर्टवर आलिया- अनुष्काची एकच बॅग, किंमत ऐकून बसेल धक्का  |  फोटो सौजन्य: Instagram

Lifestyle bollywood actress anushka sharma and alia bhatt: बॉलिवूड एक्ट्रेस नेहमीच आपल्या स्टायलिश कपडे आणि ट्रेन्डी गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता एक्ट्रेसच्या ब्रॅंडेड आणि डिझायनर कपड्यांपासून स्टायलिश हॅडबॅगपर्यंत चर्चा होत असते.  काही दिवसांपूर्वीच एक्ट्रेस आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा एक सारख्याच हॅडबॅग घेऊन दिसल्या. दोघींची ही बॅग खूपच सुंदर होती. 

शुक्रवारी आलिया भट्टचे काही फोटो समोर आले होते. या फोटोत आलिया तिचा बॉयफ्रेन्ड आणि एक्टर रणबीर कपूरसोबत एअरपोर्टवर दिसली. यावेळी आलियानं पिंक कलर टॉप घातला होता. आपला लूक आणखीन सुंदर करण्यासाठी आलियानं मल्टी कलर पेस्टर लेअरचा श्रग आणि व्हाइट कॅट- आय शेड्स घालून पूर्ण केला. यासोबत आलियानं पिंक कलरचे शूज घातले होते आणि सुंदर टोट बॅग कॅरी केली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#anushkasharma #airportdiaries

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

याआधी काही दिवसांपूर्वी एक्ट्रेस अनुष्का शर्मा ऑफ व्हाइट कलरचा सुंदर कुर्ता आणि प्लाजो पॅन्ट आणि डोक्यावर टिकली लावली होती. यासोबत अनुष्कानं व्हाइट आणि बेज रंगाची टोट बॅग कॅरी केली होती. आलिया आणि अनुष्काची ही बॅग एक सारखीच होती म्हणजेच एकदम सेम टू सेम. या बॅगच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या बॅगची किंमत जवळपास १ लाख रूपये आहे. आलिया आणि अनुष्काच्या या बॅगची किंमत ९७,५५५ रूपये आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No lukkachuppi here the couple have us fab pics #AliaBhatt #RanbirKapoor back home #airportdiaries @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास आलिया भट्ट अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त आलिया सडक- २मध्ये एक्टर आदित्य रॉय कपूरसोबत दिसेल. आलिया करण जोहरचा सिनेमा तख्तमध्ये सुद्धा दिसणार आहे. तसंच सलमान खानसोबत संजय लीला भन्साळीचा सिनेमा इंशाअल्लाहमध्ये आलिया दिसेल. तर दुसरीकडे अनुष्का शर्मानं आपल्या पुढे सिनेमाबद्दल अद्याप काही माहिती दिली नाही आहे. 

तर काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण देखील तब्बल २  लाख रूपयांच्या बॅगसोबत स्पॉट झाली होती. गेल्या शनिवारी म्हणजेच ४ मे रोजी एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी  तिचा हॉट लूक पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर टिकल्या होत्या.

deepika padukone

सध्या दीपिका आपल्या हॉट लूकमुळे चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये दीपिकाने एक बॅग कॅरी केली आहे. दीपिकाने आपल्या हातात Celine ब्रँडची काळ्या रंगाची बॅगही कॅरी केली होती. या बॅगची किंमत तब्बल २ लाख ६७ हजार रूपये इतके आहेत. दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

deepika padukone 1

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एअरपोर्टवर आलिया- अनुष्काची एकच बॅग, किंमत ऐकून बसेल धक्का Description: Anuskha and alia airport look: एअरपोर्टवर एक सारख्या बॅग घेतलेल्या बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा स्पॉट करण्यात आलं. दोघींची सुंदर बॅग खूपच महाग आहे. या बॅगची किंमत ऐकून तुम्हांला धक्काच बसेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola