तुमच्या अंदाजाच्याही बाहेर आहे आलिया भट्टच्या या ड्रेसची किंमत 

लाइफफंडा
Updated May 28, 2019 | 22:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt dress cost: बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट अर्जुन कपूरचा  इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगच्या स्पॉट करण्यात आलं. यावेळी आलियानं जो ड्रेस घातला होता त्याची किंमत खूप जास्त आहे.

Alia Bhatt
तुमच्या अंदाजाच्याही बाहेर आहे आलिया भट्टच्या या ड्रेसची किंमत   |  फोटो सौजन्य: Instagram

Bollywood Actress alia bhatt: बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट फिल्म इंडस्ट्रीतली सर्वांत यशस्वी आणि चांगल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले सिनेमे आणि लव्ह लाइफ व्यतिरिक्त आलिया आपल्या फॅशन सेन्समुळे सुद्धा चर्चेत असते. इंडियन असो वा वेस्टर्न आलिया सगळ्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसते. 

आलिया भट्ट एक्टर अर्जुन कपूरचा इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. एक्ट्रेस आलियानं यावेळी पीच आणि पिंक कलरचा स्ट्रिप्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये कमरेवर बेल्ट होता आणि समोरच्या बाजूस बटण होतं. या ड्रेसला पफ्ड स्लीव्स होते. आलियाचा हा ड्रेस खूपच सुंदर होता. आलियानं आपल्या या एंकल लेंथ ड्रेससोबत हिल्स घातल्या होत्या. आलियाचा हा ड्रेस सुंदर होता तितकाच त्याची किंमत देखील अफाट होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#aliabhatt

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आलियाच्या या ड्रेसच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, या ड्रेसची किंमत इतकी आहे की तुम्ही ऐकून हैराण व्हाल. आलियाचा हा ड्रेस Silvia Tcherassi नं डिझाईन केला आहे. या ड्रेसची किंमत जवळपास ९० हजार रूपये आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#aliabhatt snapped last night at #arjunkapoor #indiasmostwanted screening

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही दिवसांपूर्वी आलियाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी आलियानं आलियानं पिंक कलर टॉप घातला होता. आपला लूक आणखीन सुंदर करण्यासाठी आलियानं मल्टी कलर पेस्टर लेअरचा श्रग आणि व्हाइट कॅट- आय शेड्स घालून पूर्ण केला. यासोबत आलियानं पिंक कलरचे शूज घातले होते आणि सुंदर टोट बॅग कॅरी केली होती.  या सुंदर टोट बॅगची किंमत जर ऐकली तर नक्कीच हैराण व्हाल.  या बॅगच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या बॅगची किंमत जवळपास १ लाख रूपये आहे. आलियाच्या या बॅगची किंमत ९७,५५५ रूपये आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No lukkachuppi here the couple have us fab pics #AliaBhatt #RanbirKapoor back home #airportdiaries @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास आलियाचा ब्रह्मास्त्र सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहे. ज्यात आलिया एक्टर रणबीर कपूरसोबत दिसेल. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन सुद्धा दिसणार आहेत. याव्यतिरिक्त आलिया भट्ट पहिल्यांदा सलमान खानसोबत इंशाल्लाह या सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा संजय लिला भन्साळी डायरेक्ट करणार आहे. तसंच आलिया तख्त या सिनेमात ही रणवीर सिंग, विकी कौशल, करिना कपूर खान, अनिल कपूर आणि जान्हवी कपूर सोबत काम करणार आहे. आलिया भट्ट RRR या सिनेमातही दिसणार आहे. यासोबतचं आलियानं काही दिवसांपूर्वीच सडक २ ची शूटिंग सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी