Rules For Lovers : प्रत्येक प्रेमींना माहिती हवं हे सर्व नियम; अविवाहित जोडप्यांनी डोक्यात ठेवावं या गोष्टी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 01, 2022 | 14:27 IST

प्रेमी जोडप्यांना हॉटेलमधील रुममध्ये राहाण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी फिरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा अनेक अविवाहित जोडपे अशा परिस्थितीतून जातात, अशी परिस्थिती टाळण्यासाठी, जोडप्यांना काही नियम माहित असणे आवश्यक आहेत.

Things to keep in mind for unmarried couples
Rules For Lovers : प्रत्येक प्रेमींना माहिती हवं हे सर्व नियम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लग्न न करता जोडप्यांने एकत्र रहाणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप
  • लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोघांनाही इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
  • प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही.

मुंबई : प्रेमी जोडप्यांना हॉटेलमधील रुममध्ये राहाण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी फिरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा अनेक अविवाहित जोडपे अशा परिस्थितीतून जातात, अशी परिस्थिती टाळण्यासाठी, जोडप्यांना काही नियम माहित असणे आवश्यक आहेत. तुम्हाला देखील हे नियम माहित गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही या परिस्थितून वाचू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगत आहोत, जे प्रत्येक अविवाहित जोडप्याला माहित असले पाहिजेत.

1.लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा

लग्न न करता जोडप्यांने एकत्र रहाणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणि हा ट्रेंड काळाच्या ओघात झपाट्याने वाढला आहे. 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या संदर्भात म्हटले होते की, दोन प्रौढ व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी), ज्यामध्ये मुलीचे वय 18 वर्षे आहे आणि मुलगा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असेल.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोघांनाही इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका खटल्याचा निकाल देताना सांगितले होते की, प्रौढ झाल्यानंतर व्यक्ती एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यास किंवा लग्न करण्यास स्वतंत्र असते.

पोटगी सारखा लागतो खर्च 

पण ज्याप्रमाणे पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला खर्च आणि भत्ते देतो, त्याचप्रमाणे न्यायालय लिव्ह-इन नातेसंबंध संपुष्टात आल्यावर अंतिम निर्णय घेईल आणि दंडही ठोठावू शकेल.

2. हॉटेलमध्ये राहण्याचे नियम

अविवाहित प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नसल्याच्या बातम्या तुम्ही बर्‍याच वेळा ऐकल्या असतील. पण भारतीय कायद्याने प्रौढ जोडप्यांना हा अधिकार दिला आहे की, ते कुठेही जाऊ शकतात आणि कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात. प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. मात्र यासाठी दोन्ही भागीदारांना त्यांचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल. अनेक हॉटेल्समध्ये लोकल आयडी स्वीकारला जात नाही, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचाव्यात.

3. सार्वजनिक ठिकाणी बसण्याचे नियम

तुमचं लग्न झाले नसलं तरीही तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बसू शकता. IPC च्या कलम 294 नुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर, त्याला 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र या कलमाचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे कोणतेही कृत्य करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बसून बोलत असाल, तर तुम्हाला पोलीस अटक करू शकत नाहीत.

4. अपमानास्पद भाषेविरूद्ध नियम

जर एखादे जोडपे असे नातेसंबंधात असेल, ज्यामध्ये अपमानास्पद शब्द वापरले जातात. अशा परिस्थितीत, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार, मुली संरक्षणाची मागणी करू शकतात.

5. शारीरिक संबंधांवरील नियम

भारतीय संविधानाने अनुच्छेद २१ द्वारे गोपनीयतेचा अधिकार प्रदान केला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जोडपे खासगी ठिकाणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. सुप्रीम कोर्टाने 2017-2018 मध्ये 2 प्रकरणांवर आपला निर्णय पुन्हा दिला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी