Must things in bag: प्रत्येकाने आपल्या बॅगेत ‘या’ वस्तू नेहमी ठेवाव्यात, आयुष्य होईल सोपं

घराबाहेर पडताना अशा काही गोष्टी सोबत बाळगण्याचा सल्ला दिला जातो, ज्या कधीही उपयोगी पडू शकतात. अशा वस्तू आयत्या वेळी येणारे संकटांचे प्रसंग टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि आपलं आयुष्य अधिक सोपं होऊ शकतं.

Must things in bag
प्रत्येकाने आपल्या बॅगेत ‘या’ वस्तू नेहमी ठेवाव्यात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • घराबाहेर असताना पडू शकते अनेक गोष्टींची गरज
  • छोट्याशा गोष्टीवाचूनही होऊ शकते मोठी अडचण
  • काही गोष्टी सतत बॅगेत बाळगण्याची आवश्यकता

Must things in bag: कामासाठी असो किंवा सहलीसाठी, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर (Outdoor) पडतच असतो. घराबाहेर असताना अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा एखादी छोटीशी वस्तू जवळ नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घराबाहेर पडताना अशा काही गोष्टी सोबत बाळगण्याचा (Things to carry) सल्ला दिला जातो, ज्या कधीही उपयोगी पडू शकतात. अशा वस्तू आयत्या वेळी येणारे संकटांचे प्रसंग टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि आपलं आयुष्य अधिक सोपं होऊ शकतं. जाणून घेऊया, अशाच काही गोष्टी. 

टूथपिक

घराबाहेर जेवण करताना अनेकदा आपल्या दातात वेगवेगळे पदार्थ अडकण्याची शक्यता असते. विशेषतः कार्यालयात असताना किंवा एखाद्या औपचारिक मीटिंगमध्ये असताना आपल्या दातात असा पदार्थ अडकला, तर आपली अवस्था बिकट होते. हातांनी सहजासहजी दातात अडकलेला तुकडा निघत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या देहबोलीवर होताना दिसतो. त्यासाठी आपल्या बॅगेत टूथपिक असेल, तर काही मिनिटांत दातात अडकलेला तुकडा काढून टाकून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. 

रुमाल

प्रवासात येणारा घाम पुसण्यासाठी किंवा धुतलेले हात पुसण्यासाठी आपल्याला रुमालाची आवश्यकता असते. कधी कधी आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसण्यासाठीदेखील रुमालाचा उपयोग होतो. सार्वजनिक ठिकाणी असताना शिंक आल्यानंतर तुम्ही नाकावर रुमाल पकडला नाही, तर लोक तुम्हाला माफ करत नाहीत. कपड्यावर उडणारे अल्कोहोलचे थेंब पुसण्यासाठीदेखील याचा उपयोग होऊ शकतो.

अधिक वाचा - Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक? या संकेतांनी ओळखा महिलेची इच्छा

पेन

गेल्या काही वर्षात स्मार्टफोन आल्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बराच फरक पडला आहे. अनेक प्रकारच्या कामांसाठी पूर्वी पेनाचा उपयोग होत असे, त्याऐवजी आता कामकाज डिजिटल झालं आहे. मात्र तरीही अनेक कामांसाठी आपल्याला अचानक पेनची आवश्यकता असते. सही करायला, कर्मचाऱ्यांसाठी नोट लिहायला, कुटुंबातील सदस्यांना संदेश देण्यासाठी तुम्हाला पेनाची गरज भासू शकते. कुठलाही स्मार्ट आयटम पेनाची जागा अजून तरी घेऊ शकलेला नाही. 

लिपबाम

जर तुमचे ओठ सुकले असतील, तर लिपबाम लावून तुम्ही नॉर्मल करू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकण्याऐवजी तुमच्या सुकलेल्या ओठांवर लक्ष केंद्रीत करत असेल, तर तुमच्या ओठांचं स्वरुप सुधारण्याची गरज असल्याचं तुमच्या लक्षात येईल. अशा वेळी जवळ लिपबाम असेल, तर तुम्ही काही मिनिटांतच ओठांची स्थिती बदलू शकता आणि सौंदर्य पूर्ववत करू शकता. 

अधिक वाचा - Women safety tips: नव्या शहरात शिफ्ट होताय? अगोदर वाचा या सेफ्टी टिप्स

ओपनर

मेट्रो ट्रेन आणि लोकलमधील प्रवासात बॅग लटकवण्यासाठी तर याचा उपयोग होतोच, शिवाय कार्यालयातील कामाने थकल्यानंतर प्रवासात जर तुम्ही कोल्ड्रिंकची बाटली वगैरे घेतली, तर ती उघडण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही एकटे असताना सुरक्षेसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी