Chanakya Niti: शत्रूला चितपट करण्यासाठी चाणक्यांच्या या धोरणांचा करा अवलंब, लगेच मिळेल विजय

लाइफफंडा
Updated Jun 03, 2022 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti to Defeat Enemies । आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित माहिती दिली आहे. चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी शत्रू असतो.

Always remember these things of Chanakya to slay the enemy
शत्रूला चितपट करण्यासाठी चाणक्यांच्या या धोरणांचा करा अवलंब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित माहिती दिली आहे.
  • शत्रूला चितपट करण्यासाठी चाणक्यांच्या धोरणांचा करा अवलंब.
  • चाणक्य नीतीनुसार माणसाने आपल्या वाणीची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Chanakya Niti to Defeat Enemies । मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधित माहिती दिली आहे. चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी शत्रू असतो. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या शत्रूला कमजोर समजू नये तसेच त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे. नाहीतर तुमचा शत्रू त्याला संधी मिळताच तुम्हाला नुकसान पोहचवू शकतो. आचार्य चाणक्य यांनी शत्रूंना पराभूत करण्यासाठी काही गोष्टी आपल्या धोरणांमध्ये सांगितल्या आहेत, या धोरणांचा अवलंब करून तुम्ही शत्रूवर सहज मिळवू शकता. (Always remember these things of Chanakya to slay the enemy). 

अधिक वाचा : बसला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

वाईट संगतीपासून स्वत:ला वाचवा

चाणक्य नीतीनुसार, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपल्या मित्रांसह आणि कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसोबत जास्त वेळ घालवते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या संगतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जे लोक आपल्या आजूबाजूला चांगले आणि योग्य संगत ठेवतात किंवा त्यांच्या सहवासात राहतात, त्यांचे शत्रू कमी असतात अथवा त्यांचे वाईट करण्यापासून समोरचा अनेकवेळा विचार करत असतो. मात्र जर एखाद्याची संगत वाईट लोकांशी असेल तर शत्रू त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि संधी मिळाल्यास हल्ला करण्यास चुकत नाहीत. म्हणूनच तुम्ही कोणासोबत बसला आहात याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा

चाणक्य नीतीनुसार माणसाने आपल्या वाणीची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण तुमच्या बोलण्यामुळे तुमचा शत्रू त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. तुमचे बोलणे खराब असेल तर तुमचे संबंध बिघडू शकतात. खराब बोलण्यामुळे तुमचे चांगले मित्र आणि नातेवाईक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. जे लोक कडवट आणि कठोर बोलतात त्यांच्यापासून इतर लोक दूर राहणे पसंद करतात. म्हणूनच कोणाशीही बोलताना तुम्ही नेहमी नम्रतेने बोलले पाहिजे. 

चुकीच्या सवयींना आळा घाला

व्यसनासारख्या वाईट सवयींपासून प्रत्येक व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. ड्रग्जच्या आहारी गेलेली लोक शत्रूकडून सहज पराभूत होतात. नशा करत असलेला माणूस चांगल्या प्रकारे आपली बुद्धी आणि विवेक वापरण्यास असमर्थ असतो आणि अशा परिस्थितीत तो एक चूक करतो, ज्याचा फायदा त्याचे शत्रू घेऊ शकतात.

तुमच्या शत्रूची संपूर्ण माहिती ठेवा

याशिवाय जर तुम्हाला तुमच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर तुमच्या शत्रूशी संबंधित प्रत्येक माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शत्रूचे सामर्थ्य माहित असले पाहिजे. जर तुमच्याकडे तुमच्या शत्रूची संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही त्याचा सहज पराभव करू शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी