Ambedkar Jayanti 2021 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2021 Marathi Wishes: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस यांच्यामाध्यमातून तुम्ही नक्कीच जगभरात विखुरलेल्या भीम अनुयायींना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटींग्स

ambedkar jayanti 2021 wishes messages images quotes greetings
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Whatsapp status 

थोडं पण कामाचं

  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे.
  • 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा जन्म दिवस भीम जयंती  (Bhim Jayanti)किंवा आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti ) म्हणून साजरा केला जातो.
  • दरवर्षी 14 एप्रिलला भीम अनुयायी दलितांचे आधारवड असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2021 Marathi Wishes: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा जन्म दिवस भीम जयंती  (Bhim Jayanti) किंवा आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti ) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 एप्रिलला भीम अनुयायी दलितांचे आधारवड असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. गेल्या वर्षी आणि या वर्षीही महाराष्ट्रासह भारतात आणि किंबहुना जगभरात कोरोनाचं सावट असल्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता अत्यंत साधेपणाने घरगुती स्वरूपातच साजरी करण्याचे आवाहन  स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात आले आहे. 

भीम जयंती निमित्त तुम्ही लोकांना थेट भेटू शकत नसलात तरीही आज बाबासाहेबांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी  भीम अनुयायींना एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook), ट्वीटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम,  असे अनेक पर्याय खुले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस यांच्यामाध्यमातून तुम्ही नक्कीच जगभरात विखुरलेल्या भीम अनुयायींना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.


1928 पासून आंबेडकर जयंती साजरी करण्याला सुरूवात झाली. भीम जयंतीचं सेलिब्रेशन 1928 साली जनार्दन रणपिसे यांनी सुरू केले. समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे कोरोनाच्या सावटामुळे  यंदाही हा सोहळा प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून नव्हे तर घरात आणि व्हर्च्युअल जगात साजरा करायचा आहे. मग यंदाच्या भीमजयंतीच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स, मेसेजेस, विशेस, Images च्या माधयमातून भीम अनुयायींपर्यंत पोहचवण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रे आम्ही टाइम्स नाऊ मराठीच्या माध्यमातून आली आहेत. 

आज मोठ्या उत्साहात लोकांनी कोरानाचे नियम पाळून आंबेडकर जयती साजरी केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा!


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!


निळ्या रक्ताची धमक बघ

स्वाभिमानाची आग आहे

घाबरू नकोस कुणाला

तू भीमाचा वाघ आहेस

जय भीम !


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

सर्व भीम अनुयायींना हार्दीक शुभेच्छा!


तू जीवन दिधले मातीला गंधाचे

दलितांच्या दीपा तुला प्रणाम अवघ्या विश्वाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंतीच्या शुभेच्छा!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. दलित, अस्पृश्य समाजातील लोकांना त्यांचे न्याय वा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतु गेल्या वर्षीपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना यंदाही हे सेलिब्रेशन सामुहिकरित्या एकत्र येऊन न करता वैयक्तिक पातळीवर करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी