Annna Bhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शेअर करा मराठी अभिवादनपर संदेश

तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. 

Anna Bhau Sathe
अण्णा भाऊ साठे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे अण्णा भाऊ साठे यांची जयंती.
  • १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता.
  • या निमित्ताने त्यांचे विचार शेअर करून अभिवादन करा.

Annna Bhau Sathe : मुंबई : तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.  वारणेचा वाघ, विजयंता, फकीरा, इभ्रत या कादंबरीवर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. आज अण्णा भाऊ यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या कविता आणि विचार शेअर करून त्यांना अभिवादन करूया. (anna bhau sathe Birth anniversary share marathi quotes)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत मंहताची, ज्ञानवंताना जन्म देणार

नररत्नांचे दिव्य भांडार, समरधिर घेत जिथे अवतार|| जी |

आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची

इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला

अन्यायाचा कडेलोट केला ||जी||

 पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.

हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी