April Fool 2022: 'एप्रिल फूल'निमित्त मस्करी करण्याच्या या आहेत भन्नाट आयडिया

मार्चचे आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर एप्रिल महिना सुरू ह याचाच अर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांना ‘एप्रिल फूल’ (April Fool 2022) म्हणजेच मूर्ख बनवण्याचा दिवस. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसाधारणपणे आप्तीष्ठ, मित्र, कुटुंबातील व्यक्ती यांची चेष्टा केली जाते, त्यांच्याशी खोटे बोलून त्यांना फसवले जाते. 

april fool 2022 some prank ideas to make fun of april fool of friends or family members
'एप्रिल फूल'निमित्त मस्करी करण्याचा या आहेत भन्नाट आयडिया  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मार्च महिना हा आर्थिक उलाढालीसाठी खूप महत्त्वाचा महिना असतो.
 • तो संपल्यावर आपण रिलॅक्स मूडमध्ये येतो.
 • ‘एप्रिल फूल’ (April Fool 2022)  म्हणजेच मूर्ख बनवण्याचा दिवस.

मुंबई :  मार्च महिना हा आर्थिक उलाढालीसाठी खूप महत्त्वाचा महिना असतो. तो संपल्यावर आपण रिलॅक्स मूडमध्ये येतो. या रिलॅक्स मूडची सुरूवात एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून होते. ‘एप्रिल फूल’ (April Fool 2022)  म्हणजेच मूर्ख बनवण्याचा दिवस. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसाधारणपणे आपले जवळचे लोक, मित्र, कुटुंबातील व्यक्ती यांची चेष्टा केली जाते, त्यांच्याशी खोटे बोलून त्यांना शेंडी लावली जाते, सकाळी उठल्यापासून खोटी काढायला सुरूवात होते. समोरचा व्यक्ती जो पर्यंत फसत नाही तो पर्यंत प्रयत्न सुरू असतात. एकदा का तो फसला मग सुरू होते गाणे एप्रिल फूल बनाया जो तुमको घुस्सा आया.... मेरा क्या कसूर जमनाने का कसू जिसने ये दस्तूर बनाया... 

 ही खोटी करण्यात गंमत हा येवढाच भाग असतो. नक्कीच तुमच्याही डोक्यात 1 एप्रिलला आपल्या जवळच्या लोकांची मस्करी करण्याचा विचार आला असेल. तर आम्ही तुम्हांला काही साध्या आणि  सोप्या टिप्स देतो, प्रँक करण्यासाठी आयडीयांची खाली लिस्ट देत आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही लोकांना फसवू शकतात. 

एप्रिल फूल बनविण्याची यादी 

 1. स्वयंपाकघरातील ड्रॉवरमधील गोष्टी, कपाटामधील सर्व गोष्टी बदलून आई किंवा बायकोचा गोंधळ उडवून द्या.
 2. आपल्या नवऱ्याच्या फोनवर भाषा सेटिंग बदलून अशी भाषा निवडा ज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, उदा- फ्रेंच किंवा स्पॅनिश
 3. आपल्या गर्लफ्रेंडच्या साबणावर जाडसर पारदर्शक नेटपेंटचा थर चढवा. जेव्हा ती अंघोळीला जाईल तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी साबण अंगाला लागणार नाही.
 4. आपल्या मित्राच्या कीबोर्डवरील M आणि N बटणे स्विच करा. त्यानंतर मजा घ्या, जेव्हा तुमचा मित्र M टाईप करेल तेव्हा N अक्षर उलटेल आणि N दाबल्यावर M.
 5. ओरिओ बिस्किटांचा एक पॅक विकत घ्या आणि या बिस्किटांमधील क्रीम काढून त्याऐवजी टूथपेस्ट लावा, जेव्हा कोणी हे बिस्किटे खील तेव्हा त्याची चांगलीच फजिती होईल.
 6. सकाळी उठल्याबरोबर एखादी फेक बातमी बनवून सर्वांना घाबरवा किंवा आश्चर्यचकित करा. परिस्थितीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडा मसाला घालून ती गोष्ट वाढवू शकता.
 7. एखाद्या मित्राला टार्गेट करून त्याला आपल्या ग्रुपमधील सर्वांना साधारण 30 मिनिटांच्या अंतराने कॉल करून XYZ व्यक्ती बोलत आहे का? असे विचारायला सांगा.  असे सारखे कॉल आल्याने तो खूप चिडेल.
 8. आपल्या एखाद्या मित्राच्या फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यांची बर्थडेट 1 एप्रिल अशी करा. ज्यामुळे वाढदिवस नसताना लोक त्यांना शुभेच्छा देतील.

हा दिवस काही काळासाठी मस्करी करण्याचा आहे. कोणाचाही अपमान होईल. त्याला मानसिक आघात बसेल अशी कोणतीही चेष्टा करू नका. 

दरम्यान, एप्रिल फूल साजरा करण्याची प्रथा नक्की कधी सुरु झाली याबाबत काही ठोस पुरावे नाहीत. मात्र यामागची एक कथा सांगितली जाते ती म्हणजे, ‘पॉप ग्रेगरी 13 यांनी 1582 मध्ये ज्यूलियन कॅलेंडरऐवजी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे 1 जानेवारीपासून सुरु होत होते, मात्र त्याआधीपर्यंत नवे वर्ष  1 एप्रिलला साजरे केले जाई. मात्र फ्रांसमधील अनेकांनी हे नवे कॅलेंडर मानण्यास नकार दिला, ज्यांना पुढे ‘एप्रिल फूल’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे हीच गोष्ट संपूर्ण युरोप आणि जगभरात पसरली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी