April Fool 2023: 'एप्रिल फूल'साठी भन्नाट आयडियाज, ज्यांच्या मदतीने मित्रांना बनवा ULLU

April Fool prank ideas to try with friends: 1 एप्रिल रोजी जगभरात एप्रिल फूल डे साजरा करण्यात येतो. या दिवशी मित्रमंडळींना, कुटुंबीयांना वेगवेगळ्या प्रकारे खोटं बोलून त्यांना शेंडी लावली जाते. आज आम्ही तुम्हाला काही आयडियाज सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मित्रांना एप्रिल फूल करु शकता.

April Fool 2023 prank ideas to fool your friends read simple tips and tricks in marathi
April Fool 2023: 'एप्रिल फूल'साठी भन्नाट आयडियाज, ज्यांच्या मदतीने मित्रांना बनवा ULLU 
थोडं पण कामाचं
  • एप्रिल फूल निमित्त खास आयडियाज
  • या आयडियाजच्या मदतीने तुम्ही मित्रांचा करु शकता एप्रिल फूल 

April Fool prank ideas in marathi: 1 एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. म्हणजेच एकमेकांना मूर्ख बनवण्याचा दिवस. या दिवशी लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मूर्ख बनवून त्यांची चेष्टा, मस्करी केली जाते. हा दिवस अमेरिका ते कॅनडा, फ्रान्स आणि भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1686 मध्ये यूकेचे बायोग्राफर जॉन ऑबेरी यांनी केली होती. तेव्हापासून एप्रिल फूलची ही परंपरा सुरू आहे. तुम्हीही आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना एप्रिल फूल करत चेष्टा करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या आयडियाज तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात. (April Fool 2023 prank ideas to fool your friends read simple tips and tricks in marathi)

April Fool Prank ideas

  1. दुकानातून डोनट्सचा किंवा मिठाईचा एखादा बॉक्स घेऊन या. यामधील सर्व डोनट्स, मिठाई बाहेर काढा आणि त्याऐवजी गाजर, वांगी, बटाटे भरून मग तो बॉक्स टेबलवर ठेवा. जेव्हा कुणी तुमच्याकडे येईल तेव्हा त्याला वाटेल त्या बॉक्समध्ये डोनट्स किंवा मिठाई आहे आणि ते बॉक्स उघडतील तेव्हा त्यांचा एप्रिल फूल होईल.
  2. तुमच्याकडे जुना डिलिव्हरी बॉक्स असेल तर त्याचा तुम्ही एप्रिल फूल प्रँकसाठी वापर करु शकता. त्यात एप्रिल फूल लिहिलेल्या चिठ्ठ्या टाका आणि मग ज्याचा एप्रिल फूल करायचा आहे त्याच्या घरी तो बॉक्स डिलिव्हरी करा. त्याने तो बॉक्स उघडून पाहताच त्याचा एप्रिल फूल होईल.
  3. तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सॉफ्ट ड्रिंक खूप आवडत असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही हा प्रँक नक्कीच ट्राय करु शकता. त्यांच्या कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये सोया सॉस भरा. रंग सारखा असल्याने त्यांना ओळखता येणार नाही आणि ते जेव्हा पिण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडलेला असेल.
  4. शॅम्पू किंवा कंडिशनरच्या बाटलीच्या तोंडावर ट्रान्सपरंट प्लास्टिक चिटकवा. जेव्हा कोणी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा शॅम्पू त्यातून बाहेर येणारच नाही आणि त्यांचा चांगलाच गोंधळ उडेल.
  5. कार प्रेमी व्यक्तींसोबत प्रँक करण्यासाठी तुम्ही त्यांच्या गाडीच्या काचेवर तुटलेल्या काचेचे स्टिकर चिकटवा. सकाळी जेव्हा ते हे दृश्य पाहतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असेल.
  6. एखाद्याला मूर्ख बनवण्याची सर्वात जुनी पद्धत म्हणजे खोटे झुरळ, पाल किंवा इतर किटक त्यांच्या खोलीत ठेवा आणि मग त्यांची रिअ‍ॅक्शन पाहा.
  7. किचनमधील वस्तूंची जागा बदलून इतरत्र ठेवा यामुळे किचनमध्ये गेलेल्या आई, बहीण किंवा बायकोचा गोंधळ उडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी