April Fool Day 2022: नवी दिल्ली : एप्रिल फूल (April Fool) म्हणजेच एकमेंकाना मूर्ख बनवण्याचा दिवस जगभरात (World) साजरा केला जातो. एप्रिलच्या पहिल्या दिवशी लोक एकमेकांवर विनोद करतात. या दिवसानिमित्त लोक एकमेकांना खोडकर संदेशही (Message) पाठवतात. प्रत्येकजण या दिवशी कोणत्याना कोणत्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवत असतात. यामुळे वाचकांनो सावधान व्हा कारण हा दिवस उद्याच येत आहे.
एप्रिल फूलला काय केलं जातं हे आपल्याला माहिती आहे, परंतु या दिवसाची सुरूवात कधीपासून झाली याची माहिती तुमच्याकडे आहे. नाही त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत... घाबरु नका, याविषयी आम्ही तुमचा एप्रिल फूल करणार नाही आहोत.
खरं सांगयचं झालं तर हा एप्रिल फूलचा दिवस कधीपासून सुरू झाला याची निश्चित माहिती आमच्याकडेही नाही. अद्याप ही माहिती कोणाकडेच नाहीये. परंतु लोकांचा असा विश्वास आहे की, फ्रेंच दिनदर्शिकेत होणारा बदल हा एप्रिल फूल डे च्या नावाने साजरा करण्याची सुरुवात असू शकते. तर काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा याचे अॅनीसोबत लग्न ठरलं होतं. त्यामुळे एप्रिल फूलचा दिवस साजरा केला जातो. काही लोक या दिवसाचा संबंध हिलारिया महोत्सवाशीदेखील लावतात.
हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याविषयीची सर्वात भारी अख्यायिका म्हणजे जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलपासून करत. तर मीडिल युरोपमध्ये नवीन वर्षाचा उत्सव 25 मार्च रोजी साजरा केला गेला. परंतु 1852 मध्ये पोप ग्रेगोरी 8 वे यांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका जाहीर केली, त्यानंतर जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली.
Read Also : २५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केला मुलीवर अत्याचार
ग्रेगोरियन कॅलेंडर फ्रान्सने प्रथम स्वीकारले होते. परंतु लोकांच्या मते, युरोपमधील बर्याच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नव्हते, तेव्हा बरेच लोक त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. ज्यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले. नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवं वर्ष साजरे करणाऱ्या लोकांना मूर्ख समजतं. त्यानंतर एप्रिल फूल साजरे करण्यास सुरुवात झाली.
Read Also : मोफत अर्धा लिटर हवंय मग देशाच्या जुन्या पक्षाकडे जा..
दरम्यान, एप्रिल फूल दिन वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची वेळ वेगवेगळी आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिन फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. तर जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझीलमध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो.