Tattoo Risks and Precautions: अबब! जोडप्याचा शरीरावर 98 टॅटूचा विश्वविक्रम...जाणून घ्या टॅटूशी संबंधित धोके

World Record of Tattoo : जर तुमच्या जोडीदाराचा आणि तुमचा छंद एकच असेल तर मग विचारायलाच नको. अर्जेटिनातील एका जोडप्याबाबत असेच घडले आहे. हे जोडपे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. गॅब्रिएला आणि व्हिक्टर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी आपल्या शरीरावर थोडथोडके नव्हे तर तब्बल 98 टॅटू (Tattoo) काढण्याचा आणि शरीरात बदल करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या निमित्ताने टॅटू काढण्याचे धोके जाणून घेऊया.

Guinness world record of Tattoo
टॅटूचा विश्वविक्रम 
थोडं पण कामाचं
  • अर्जेंटिनामधील एक जोडपे मागील काही दिवसांपासून चर्चेत
  • दोघांनाही टॅटू काढण्याचा नाद
  • जोडप्याने शरीरावर तब्बल 98 टॅटू काढण्याचा केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Tattoo Risks and Precautions:नवी दिल्ली : आपल्या छंदासाठी किंवा आवडीसाठी (Passion) अनेक माणसे काहीही करायला तयार असतात. त्यातच जर तुमच्या जोडीदाराचा आणि तुमचा छंद एकच असेल तर मग विचारायलाच नको. अर्जेटिनातील एका जोडप्याबाबत (Couple in Argentina) असेच घडले आहे. हे जोडपे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. गॅब्रिएला आणि व्हिक्टर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी अलीकडेच एक विक्रम केला आहे. या दोघांनी आपल्या शरीरावर थोडथोडके नव्हे तर तब्बल 98 टॅटू (Tattoo) काढण्याचा आणि शरीरात बदल करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness world record of Tattoo) केला आहे.  याआधीदेखील 2014 मध्ये या जोडप्याने आपल्या शरीरात 84 बदल करून विश्वविक्रम केला होता. आता त्यांनी आपलाच विश्वविक्रम मोडला आहे. अलीकडच्या काळात टॅटूची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र टॅटू काढणे जितके स्टायलिश दिसते तितकेच ते धोकादायक देखील असू शकते. टॅटूमुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या- (Argentina couple created world record of tattoo, know the risks of tattoo read in Marathi)

अधिक वाचा - Winter health tips: 99% लोकांना माहित नसते व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा...जाणून घ्या

टॅटू काढण्याचा जबरदस्त छंद अर्जेंटिनाच्या या जोडप्याला आहे. या जोडप्याने आतापर्यंत 98 टॅटू, 50 छेदन, 8 मायक्रोडर्मल्स, 14 बॉडी इम्प्लांट, 5 डेंटल इम्प्लांट, 4 कान विस्तारक, 2 कान बोल्ट आणि 1 काटे असलेली जीभ त्यांच्या शरीरावर काढली आहे. ते एवढ्यावरदेखील थांबले नाहीत. त्यांनी आपल्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर टॅटू बनवले आहेत, ज्यामुळे त्यांचे डोळे पूर्णपणे काळे दिसत आहेत. 

शरीरावर टॅटू काढण्याचे धोके - (Risk of Tatoo)

अ‍ॅलर्जी होणे: टॅटू काढल्यामुळे त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. एखादी अॅलर्जी होऊ शकते.  विशेषत: लाल, हिरवा, पिवळा आणि निळा रंगांची अॅलर्जी टाकू काढणाऱ्यांना होऊ शकते. या रंगांमुळे टॅटूच्या ठिकाणी खाज सुटणे आणि सूज येऊ शकते.

त्वचेवर संसर्ग: टॅटू काढल्यानंतर त्वचा अतिशय संवेदनशील स्थितीत असते. अशावेळी त्वचेला जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. काही लोकांना टॅटू काढल्यानंतर सूज येण्याची समस्याही दिसून येते. टॅटू केलेल्या शरीराच्या ठिकाणी जळजळ देखील होऊ शकते.

अधिक वाचा - मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव

रक्तजन्य रोग: टॅटू मशीनची सुई दूषित आणि संक्रमित झालेली असल्यास तुम्हाला तो संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे हेपेटायटीस बी, सी आणि एचआयव्हीसह विविध गंभीर किंवा जीवघेणे रक्तजन्य रोग होऊ शकतात. हे आजार घातक आणि प्राणघातक ठरू शकतात.

सेप्सिस: हा एक जीवघेणा आजार असून तो संसर्गामुळे होतो. या आजारामुळे माणसाचे अवयव निकामी होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. टॅटू काढल्यानंतर या आजाराचादेखील धोका असतो.

अधिक वाचा - Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना मिळाली बहीण प्रियंकाची साथ, मध्यप्रदेशातील सहभागामुळे ‘ही’ चर्चा सुरू

सुरक्षित टॅटूसाठी अंमलात आणा या टिप्स - (Tips for safe Tatoo)

  1. टॅटू नेहमी परवानाधारक पार्लरमधूनच बनवा. तसेच स्वच्छ आणि निर्जंतुक उपकरणे तपासा.
  2. टॅटू काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्या कलाकाराने आपले हात धुतले आहेत आणि तो हातमोजेदेखील वापरतो याची खातरजमा करून घ्या. 
  3. टॅटूसाठी आधी वापरलेल्या सुया आणि वस्तरा पुन्हा वापरू नयेत.
  4. आपल्याला जिथे टॅटू काढायचा आहे ती जागा जंतुनाशकाने स्वच्छ करा.
  5. ताजे टॅटू उघडे न ठेवता पट्टीने झाकून ठेवा. त्यामुळे संसर्ग टाळता येईल.
  6. टॅटू काढण्यासाठीचे अवजार, सुई नेहमी स्वच्छ आहेत आणि त्या तुमच्यासाठीच वापरण्यात आल्या आहेत याची खातरजमा करा. 
  7. नाजूक भागांवर टॅटू काढण्यासाठीची सुई पातळ असली पाहिजे.
     
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी