Chanakya Niti: या 4 गोष्टी असतात गरिबीचे लक्षण, सावध व्हा नाहीतर होईल मोठे नुकसान

Aacharya Chanakya : आचार्य चाणक्याची (Aacharya Chanakya) जीवनविषयक मार्गदर्शक तत्वे आजही लागू पडतात. त्यामुळे सर्वचजण त्यांना गांभीर्याने घेत असतात. जीवनात आनंद असेल तर दु:खदेखील असतेच. काळ नेहमीच सारखा नसतो, परंतु या चांगल्या आणि वाईट वेळा येण्यापूर्वी आपल्याला काही चिन्हे दिसतात, संकेत मिळतात. माहितीच्या कमतरतेमुळे, लोक सहसा हे संकेत समजत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत.

Chanakya Niti
चाणक्य नीती 
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्याची (Aacharya Chanakya) जीवनविषयक मार्गदर्शक तत्वे आजही लागू
  • काळ नेहमीच सारखा नसतो, परंतु या चांगल्या आणि वाईट वेळा येण्यापूर्वी आपल्याला काही चिन्हे दिसतात
  • आचार्य चाणक्य यांनी अशा घटना सांगितल्या आहेत ज्या वाईट काळ दर्शवतात

Chanakya Niti : नवी दिल्ली : आचार्य चाणक्याची (Aacharya Chanakya) जीवनविषयक मार्गदर्शक तत्वे आजही लागू पडतात. त्यामुळे सर्वचजण त्यांना गांभीर्याने घेत असतात. जीवनात आनंद असेल तर दु:खदेखील असतेच. काळ नेहमीच सारखा नसतो, परंतु या चांगल्या आणि वाईट वेळा येण्यापूर्वी आपल्याला काही चिन्हे दिसतात, संकेत मिळतात. माहितीच्या कमतरतेमुळे, लोक सहसा हे संकेत समजत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत. वास्तुशास्त्र, स्वप्नशास्त्र, अगदी आचार्य चाणक्य यांनी अशा घटना सांगितल्या आहेत ज्या वाईट काळ दर्शवतात. याकडे लक्ष दिल्यास आगामी अनेक आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास टाळता येतील. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्यानुसार वाईट काळाचे कोणते लक्षण आहेत. (As per Aacharya Chanakya these are 4 indications of poverty)

अधिक वाचा : Chanakya Niti: कशा लोकांपासून नेहमी सावध राहावे...चाणक्य नीती काय म्हणते ते जाणून घ्या

गृहकलह किंवा घरांमधील वाद

कुटुंबात वाद होतात. असे एकही घर नाही जिथे कधीही भांडण झाले नाही, परंतु घरात दररोज वाद होणे चांगले मानले जात नाही. ज्या घरात रोज संकटे येतात त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. चाणक्यच्या मते, हे आर्थिक बाजू कमकुवत होण्याचे लक्षण आहे. घरातील नकारात्मकतेमुळे व्यक्तीला मानसिक आजाराने घेरले जाऊ शकते.

मोठ्यांचा अपमान

जिथे मोठ्यांचा अपमान होतो, त्या घरचे आशीर्वाद निघून जातात. भाग्य दुर्दैवात बदलते. वृद्धांशी वाईट वागणूक हे घराच्या विनाशाचे लक्षण आहे. आचार्य चाणक्याच्या मते याचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतील.

अधिक वाचा : Relationship Tips: मुलांच्या या सवयींवर फिदा होतात मुली, लगेच पडतात प्रेमात

तुळस

घरात हिरवी तुळशी असणे हे सुखी आणि आनंदी जीवनाचे लक्षण आहे. परंतु जर तुळशी सुकायला लागली तर ते काही भयानक घटना घडण्याचे संकेत देते. चाणक्यच्या मते, अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते.

तुटलेली काच

काचा तुटणे ही सामान्य गोष्ट आहे पण जर ही घटना घरामध्ये वारंवार घडत असेल तर ते अशुभ लक्षण आहे. घरातील तुटलेल्या काचेतून गरिबी येते असे चाणक्य सांगतात.

अधिक वाचा : Chanakya Niti: चाणक्य नितीच्या या ३ गोष्टींचे केले पालन तर गुडघे टेकण्यास भाग पडेल शत्रू

आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांनी त्यांच्या धोरणांमध्ये बरेच काही लिहिले आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक धोरण माणसाला जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देते. हेच कारण आहे की आजही लोकांवर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा प्रभाव आहे आणि त्याची उदाहरणे वांरवार दिली जातात. आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचा सामना करावा लागतो, वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अनेकवेळा आपल्या अवतीभोवती चुकीची किंवा घातकी, दगाबाज माणसे असतात त्याचा आपल्याला फटका बसतो.

आचार्य चाणक्य निती(chanakya niti) आजही हजारो वर्षानंतरही लागू पडते. आयुष्यातील प्रत्येक समस्या आणि त्याचे उत्तर आपल्याला आचार्य चाणक्य नितीमध्ये सापडते. चाणक्य निती मनुष्याच्या जीवनाला यशस्वी बनवते. तर शत्रूवर विजय मिळवण्यासाठी या नितीमध्ये अचूक मंत्र दिले आहेत.यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण मानसिकरित्या कणखर असले पाहिजे.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी