Today in History Tuesday, 16th August 2022 : आज आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन तसेच आर आर पाटील यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन.
  • आजच्या दिवशी कोलकातात भीषण दंगल उसळली होती.
  • आज आहे राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा स्मृतीदिन.

Today in History: Tuesday, 16th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  (atal bihari vajpayee death anniversary know today in history 16th august 2022)

१६ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  1. १९७०: मनीषा कोईराला - नेपाळी-भारतीय अभिनेत्री
  2. १९७०: सैफ अली खान - अभिनेते - पद्मश्री
  3. १९५८: मॅडोना - अमेरिकन गायिका, नर्तिका आणि उद्योजिका
  4. १९५७: आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (निधन: १६ फेब्रुवारी २०१५)
  5. १९५४: हेमलता - पार्श्वगायिका
  6. १९५२: कीर्ती शिलेदार - गायिका व अभिनेत्री
  7. १९५०: जेफ थॉमसन - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
  8. १९४८: बेरी हे - भारतीय-डच रॉक संगीतकार
  9. १९१३: मेनाकेम बेगीन - इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: ९ मार्च १९९२)
  10. १९०४: सुभद्राकुमारी चौहान - हिंदी कवयित्री (निधन: १५ फेब्रुवारी १९४८)
  11. १८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर - संतचरित्रकार (निधन: २७ ऑगस्ट १९५५)


१६ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  1. २०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
  2. १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
  3. १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
  4. १९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  5. १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  6. १९४६: कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
  7. १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

१६ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. २०२०: चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: २१ जुलै १९४७)
  2. २०१८: अटल बिहारी वाजपेयी - भारताचे १० वे पंतप्रधान - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: २५ डिसेंबर १९२४)
  3. २०१५: ऍना काश्फी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९३४)
  4. २०१५: ऍन्ना काश्फी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९३४)
  5. २०१०: नारायण गंगाराम सुर्वे - कवी (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)
  6. २००३: इदी अमीन - युगांडाचा हुकुमशहा
  7. २०००: रेणू सलुजा - चित्रपट संकलक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ५ जुलै १९५२)
  8. १९९७: नुसरत फतेह अली खान - पाकिस्तानी सूफी गायक (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)
  9. १९९७: पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री पणशीकर - भारतीय संस्कृती व अध्यात्म प्रसारक
  10. १९७९: जॉन डायफेनबेकर - कॅनडा देशाचे १३वे पंतप्रधान (जन्म: १८ सप्टेंबर १८९५)
  11. १९७७: एल्विस प्रेसली - अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (जन्म: ८ जानेवारी १९३५)
  12. १९६१: अब्दुल हक - भारतीय भाषाशास्त्रज्ञ (जन्म: २० एप्रिल १८७०)
  13. १९४८: बेब रुथ - ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू (जन्म: ६ फेब्रुवारी १८९५)
  14. १८८८: जॉन पंबरटन - कोकाकोलाचे निर्माते (जन्म: ८ जुलै १८३१)
  15. १८८६: रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंदांचे गुरू (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६)
  16. १७०५: जेकब बर्नोली - स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी