August Holidays: ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस; 'या' ठिकाणी फिरण्याचं करू शकता प्लॅनिंग

August travel plan: ऑगस्ट महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुटुंबासोबत फिरण्याचं प्लॅनिंग नक्कीच करू शकता. 

August holidays you can plan tour and travel here in long weekend read details
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा महापूर
  • तब्बल १३ दिवस बँक हॉलिडे
  • फॅमिलीसोबत एन्जॉय करा सुट्टी

Plan for picnic for August holidays: ऑगस्ट महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत आणि यामुळेच ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा महापूर येणार असल्याचं दिसत आहे. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, मोहरम, स्वातंत्र्य दिन, पतेती, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला ऑगस्ट महिन्यात आहेत. या सण-उत्सवांमुळे दोन लॉंग वीकेंड्स किंवा चार ते पाच दिवस सुट्टी एन्जॉय करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही अशा काही ठिकाणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही फिरण्याचं प्लॅनिंग करु शकता. (August holidays you can plan tour and travel here in a long weekend read details)

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील खूपच सुंदर असं हिल स्टेशन आहे. सर्वत्र हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य, धबधबे हे दृश्यांमुळे तुम्ही आपली सुट्टी एकदम एन्जॉय करू शकता. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला इथं जाणं नक्कीच आवडेल.

मुन्नार

केरळमधील मुन्नार हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही जोडीदारासोबत फिरायला नक्कीच जाऊ शकता. किंवा कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. साहसी ते निसर्गप्रेमी अशा दोन्ही प्रकारच्या भटकंतीसाठी हे ठिकाण स्वर्गासाठी कमी नाहीये.

अधिक वाचा : नाईट आऊटचे शौकीन आहात? मग या ठिकाणी नक्की जा...

अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबारला भेट देण्यासाठी पावसाळी हंगाम देखील सर्वोत्तम आहे. या सीझनमध्ये तुम्ही इथे प्लॅनिंग करून खूप पैसेही वाचवू शकता. त्यामुळे तुम्ही इथे नियोजन करत असाल तर जितक्या लवकर तिकीट बूक कराल तितकं चांगलं आहे. इथल्या शांत आणि निवांत वातावरणात प्रवास आणि फोटोग्राफीची एक वेगळीच मजा आहे.

अधिक वाचा : 'या' पर्यटन स्थळी घ्या सरकारी गेस्ट हाऊसचा आनंद, फक्त...

मेघालय

पावसाळ्यात धबधबा आणि निसर्गसौंदर्य पाहण्याची वेगळीच मजा असते. हा आनंद तुम्ही मेघालयात नक्कीच लुटू शकतात. धबधब्यांच्या व्यतिरिक्त इथले पर्वत देखील पाहता येतात. आशियातील सर्वात स्वच्छ गावांचा नजारा तुम्हाला इथे पहायला मिळेल.

कूर्ग

कर्नाटकातील कूर्ग हे ऑगस्ट महिन्यात भेट देण्यासाठी एक योग्य हिल स्टेशन आहे. जिथे तुम्ही निसर्गाचे सुंदर नजारे जवळून पाहू शकता. याशिवाय तिबेटी मठ, मांडला पट्टी आणि दुबरे एलिफंट कॅम्प सारखी ठिकाणे देखील आहेत जी तुमची ट्रिप आणखी मजेदार बनवतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी