Five imp health tips : अकाली वृद्धत्व येऊ नये म्हणून टाळा या पाच चुका

तब्येतीची काळजी घ्यायची असेल आणि लवकर वृद्धत्व येऊ नये असे वाटत असेल तर कळत नकळत अंगवळणी पडलेल्या चुकीच्या सवयी कायमच्या सोडून देणे आवश्यक आहे. पाच चुका टाळून आपण अकाली येणारे वृद्धत्व टाळू शकाल. जाणून घेऊ या पाच चुकीच्या सवयी...

Bad Habits for health
अकाली वृद्धत्व येऊ नये म्हणून टाळा या पाच चुका 
थोडं पण कामाचं
  • अकाली वृद्धत्व येऊ नये म्हणून टाळा या पाच चुका
  • धुम्रपान आणि मद्यपान सोडा
  • फास्ट फूड, जंक फूड आणि गोडाचे अतिरिक्त सेवन सोडा

Bad Habits for health : मानवी आयुष्यातला अखेरचा टप्पा हा वृद्धत्वाचा असतो. पण कोणताही माणूस वृद्ध होऊ इच्छीत नाही. कारण वृद्धत्वाच्या काळात आपण कमकुवत होता. आयुर्वेदानुसार वृद्धत्वाच्या काळात आपले शरीर थकत जाते. शरीरातील ताकद कमी होत जाते. त्वचेला सुरकुत्या पडतात आणि केस पांढरे होतात वा गळून जातात. हाडे कमकुवत होतात वा ठिसुळ होतात. काहींना आजारपणाला सामोरे जावे लागते आणि आणखी अशक्तपणा येतो. यामुळे लवकर वृद्धत्व येऊ नाही यासाठी प्रत्येकजण कमी जास्त प्रमाणात तब्येत सांभाळतो.... आता आपल्याला पण तब्येतीची काळजी घ्यायची असेल आणि लवकर वृद्धत्व येऊ नये असे वाटत असेल तर कळत नकळत अंगवळणी पडलेल्या चुकीच्या सवयी कायमच्या सोडून देणे आवश्यक आहे. पाच चुका टाळून आपण अकाली येणारे वृद्धत्व टाळू शकाल. जाणून घेऊ या पाच चुकीच्या सवयी...

धुम्रपान आणि मद्यपान सोडा

धुम्रपान आणि मद्यपान या दोन आरोग्यास अपाय करणाऱ्या अर्थात चुकीच्या सवयी आहेत. या सवयी कायमच्या सोडून देणे आरोग्याच्या हिताचे आहे. धुम्रपान फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण कमी होते आणि लवकर वृद्धत्व येते. तसेच मद्यपान हाडे कमकुवत करते. अती मद्यपानामुळे त्वचेला लवकर सुरकुत्या पडू लागतात. 

धुम्रपान आणि मद्यपान यांच्या व्यतिरिक्त महत्त्वाच्या अशा पाच चुकीच्या सवयी, ज्यांच्यामुळे अकाली वृद्धत्व येण्याचा धोका असतो त्या जाणून घ्या....

  1. जंक फूडचे सेवन - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, कामाची गडबड असल्यामुळे अथवा हौस म्हणून अनेकजण फास्ट फूड आणि जंक फूड खाणे पसंत करतात. दीर्घकालीन आरोग्याचा विचार करतात या दोन आरोग्यास अपाय करणाऱ्या आणि अकाली वृद्धत्वाकडे घेऊन जाणाऱ्या सवयी आहेत. यामुळे या सवयी कायमच्या सोडणे हिताचे आहे.
  2. अतिरिक्त गोड पदार्थांचे सेवन - मर्यादेपेक्षा जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते. यामुळे डायबिटिस (मधुमेह) तसेच ब्लड प्रेशरचा (रक्तदाब) त्रास होण्याची शक्यता असते. वजन वाढण्याची तसेच त्वचेला सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. यामुळे मर्यादेपेक्षा जास्त गोडाचे सेवन टाळावे.
  3. कमी पाणी पिणे - दररोज भरपूर पाणी प्यावे. कामाच्या नादात अनेकजण कमी पाणी पितात. ही सवय अतिशय घातक आहे. पाण्याच्या अभावी त्वचेला सुरकुत्या पडू शकतात तसेच त्वचेचा तजेलदारपणा कमी होऊ शकतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जावी यासाठीही पाणी उपयुक्त आहे. यामुळे दररोज भरपूर पाणी आवश्यक आहे. दिवसभरात किमान चार ते सहा लिटर पाणी प्यावे.
  4. कमीत कमी शारीरिक हालचाली - हल्ली बैठे काम, वर्क फ्रॉम होम आणि यंत्रांच्या उपलब्धतेमुळे माणसाच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. व्यायामाचे प्रमाण कमी झाले आहे. शरीराला कोणत्या प्रकारे श्रम पडत नसल्यामुळे स्नायू कमकुवत होत आहेत. वजन वाढण्याची, डायबिटिस (मधुमेह) तसेच ब्लड प्रेशरचा (रक्तदाब) त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे कामाच्या निमित्ताने चालणे, जिना चढणे, घरकामांच्या निमित्ताने थोड्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. 
  5. कमी झोप घेणे - माणसाला किमान चार-सहा आणि कमाल सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या काळात स्नायू आणि त्वचा नैसर्गिकरित्या स्वतः पूर्ववत करतात. दिवसभरातल्या कामामुळे आलेला थकवा दूर होतो. मेंदू नव्या कामांसाठी परत ताजातवान आणि सक्रीय होतो. पण अनेकजण कामाच्या निमित्ताने कमीत कमी तास झोपतात. ही एक चुकीची सवय आहे आणि ती लवकर सोडणे आवश्यक आहे.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी