weight loss mistakes: वजन कमी करण्यासाठी सकाळी हे चुका करणे टाळा, नाही तर होईल उलट परिणाम

लाइफफंडा
Updated Jul 08, 2022 | 21:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

how to burn belly fat: सर्वाना वजन कमी करण्याचे परिणाम लवकरात लवकर पाहायचे आहेत. पण काही चुका तुम्हाला भारी पडू शकतात. 

वजन कमी करण्याचे उपाय
lose belly fat and weight losing tips  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जेव्हा पूर्ण जगात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्य़ाला लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमचा अनुभव आला.
  • यामुळे मागील दोन वर्षात घरून काम करणाऱ्या तरुणांच्या वजनात वाढ झाली आहे.
  • पण आता हे वजन कमी करणे अवघड होत आहे

weight loss mistakes in morning : जेव्हा पूर्ण जगात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्य़ाला लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमचा अनुभव आला. यामुळे मागील दोन वर्षात घरून काम करणाऱ्या तरुणांच्या वजनात वाढ झाली आहे. पण आता हे वजन कमी करणे अवघड होत आहे. पोटाची चरबी कमी करणे सोपे नाही. त्यामुळे आपल्याला योग्य व्यायाम आणि योग्य आहाराची गरज आहे. काही लोकं उत्साहाच्या भरात चुका करुन टाकतात ज्याचा उलट परिणाम त्यांना भोगावा लागतो. असे चुका केल्याने वजन कमी न होता वाढू लागते. 

अधिक वाचा : 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कसे

मुळात सकाळचा वेळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. सुरुवातीलाच जर चुका केल्यात पूर्ण दिवस वाया जातो. आज आम्ही पहाटे कोणत्या चुका टाळाव्यात हे तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला पोटाच्या चरबी पासून सुटका मिळेल.

आपल्याला ऑफिसला पोहोचायची इतकी घाई असते की, आपण सकाळी नाश्ता करणे विसरून जातो. तज्ञांचे मत असे आहे की, कोणत्याही परिस्थितीत नाश्ता करणे टाळायचे नाही. नाहीतर याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शरिराला थकवा, अपचन, स्ट्रेसचा सामना करावा लागू शकतो. 

अधिक वाचा : नोरा फतेहीच्या साडीतील कातिल अदा

 नाश्त्यात योग्य आहार घेणे गरजेचे आहे, नाहीतर वजन जास्त वाढू शकते.  नाश्त्यात ब्रेड खाल्ल्याने शरिरात कार्ब्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे खाण्यात ओट्सचे सेवन करावे.  आजकाल उशिरापर्यत जागणे आणि मोबाईलचा अति वापर यामुळे आपण उशिरा झोपतो, जे आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे वजन वाढू लागते आणि वाईट सवय लागते. तर आजपासून ह्या सवयी टाळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी