Parenting Tips: या 5 गोष्टींचा मुलांवर होतो विपरित परिणाम...टाळा या चुका

Parenting Mistakes : सर्वच पालक (Parents) काही परिपूर्ण नसतात. मुलांचे संगोपन करता करताच अनेक पालक अनुभवांमधून रोज नवा धडाही शिकत असतात. त्यामुळे पालकांकडूनही चुका होण्याची शक्यता असते. मुलांचे संगोपन करताना काही कमतरता राहून गेल्याची शक्यता असते. मुलांचे संगोपन करताना पालकांनी थोडे भान ठेवल्यास आणि काही गोष्टी टाळल्यास मुलांवर योग्य परिणाम साधला जातो. पालकांनी काही चुका टाळणे (Parenting Mistakes)आवश्यक असते.

Parenting Tips
पालकत्वासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • पालक होणे ही अवघड गोष्ट
  • मुलांचे संगोपन करताना पालक अनेक चुका करतात
  • मुलांवर विपरित परिणाम करणाऱ्या चुका

Things that have negative impact on kids:नवी दिल्ली : पालक होणे हे काही सोपे काम नसते. मुलांचे संगोपन (Parenting)करणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य प्रकारे  विकास करणे हे अतिशय जबाबदारीचे आणि कठीण काम असते. अर्थात सर्वच पालक (Parents) काही परिपूर्ण नसतात. मुलांचे संगोपन करता करताच अनेक पालक अनुभवांमधून रोज नवा धडाही शिकत असतात. त्यामुळे पालकांकडूनही चुका होण्याची शक्यता असते. मुलांचे संगोपन करताना काही कमतरता राहून गेल्याची शक्यता असते. मात्र या चुका म्हणजे त्यांना मुलांची चिंता नसते किंवा ते आपल्या मुलांवर प्रेम करत नाहीत किंवा त्यांचा चांगला विचार करत नाहीत असा होत नाही. मुलांचे संगोपन करताना पालकांनी थोडे भान ठेवल्यास आणि काही गोष्टी टाळल्यास मुलांवर योग्य परिणाम साधला जातो. पालकांनी काही चुका टाळणे (Parenting Mistakes)आवश्यक असते.  ज्या चुकांविषयी पालकांनी आपल्या मुलांशी नकळतही बोलू नयेत अशा चुका कोणत्या ते पाहूया. (Avoid these mistakes while parenting which have negative impact on child)

अधिक वाचा - Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मुलांचे संगोपन पालक कसे करतात यावर मुलांचा सर्वागिण विकास अवलंबून असतो. अर्थात मुलांची काळजी घेणे म्हणजे फक्त चांगले अन्न आणि चांगले कपडे देणे नव्हे. तर त्यांच्याशी चांगली वर्तणूकदेखील केली पाहिजे. अनेक वेळा पालक अनवधानाने आपल्या मुलांशी रागाच्या भरात अशा चुकीच्या पद्धतीने बोलतात पण त्याचा त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊ लागतो. याचा उलटा परिणाम होत मूल भित्रे किंवा हिंसक होत जाते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊया 

मुलांचे संगोपन करताना टाळा या चुका -

रागवण्याऐवजी समजावून सांगा

अनेकवेळा मुलांना वर्गात चांगले गुण मिळत नाहीत. त्यावर पालक चिडतात. मात्र अशावेळी त्यांच्यावर रागावू नका. त्यांना समजून घ्या. मुलांवर सतत रागावल्याने तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी होईल आणि त्याच्यात भीती निर्माण होईल. तुमच्या मुलाला चांगले काम करण्यास मदत करण्यासाठी स्वतः कठोर परिश्रम करा. मुलांना समजावून सांगत त्यांच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुढे जातील.

अधिक वाचा - Home remedies for pimples: फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज, करा हे उपाय

वडीलांची धमकी देऊ नका 

बऱ्याचवेळा मुले ही आईच्या जवळ असतात. ते भावनिकदृष्ट्या आईशी जोडलेले असतात. तर वडीलांपासून ते एक अंतर राखून असतात. ते आईजवळ सर्व सांगतात आणि वडीलांजवळ तितक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मुलाच्या प्रत्येक छोट्या-छोट्या चुकीसाठी वारंवार वडिलांच्या नावाची धमकी आई मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र याचा उलटा परिणाम होत मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदराऐवजी भीती निर्माण होते.

टोमणे मारू नका
पालक मुलांनी अपेक्षित कामगिरी न केल्यास, इतर मुलांशी तुलना करताना त्यांना टोमणे मारतात. यामुळे मुले चिडचिड करतात. ते अनेकवेळा हट्टी होत जातात.

अधिक वाचा  : शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भररस्त्यात चाकूने वार

इतरांशी तुलना
प्रत्येक मुल स्वतंत्र असते. त्याची सारखी इतरांशी तुलना करू नका. यामुळे मुलांमध्ये भेदभाव निर्माण होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून मुलांच्या मनात न्यूनगंड वाढू लागतो.

मुलांचा आहार
काहीवेळी पालक मुलांच्या खाण्यावरूनदेखील ओरडतात. यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. ते इतर मुलांपेक्षा स्वतःला कमी लेखू लागतात. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी