Bail Pola Messages in Marathi: उत्सवांचा, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणा-या श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्येने होते. हा दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात बैल पोळा (Bail Pola) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बळीराजाचा सच्चा मित्र, सवंगडी असणा-या बैलाची पूजा केली जाते. दिवसरात्र मेहनत करून हा शेतकरी राजा हा देशाला पोषणाची जबाबदारी घेतो. या बळी राजाचा साथीदार म्हणजे त्याचा बैल. शेत नांगरणीपासून धान्याच्या मळवणी पर्यंत हा मुका जीव वर्षभर राबराब राबत असतो. आपल्या जगाच्या पोशिंद्याला बळ देत असतो. पण त्याचे हे योगदान कधीच अधोरेखित होत नाही. त्यामुळे मग सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बळीराजाचे आभार मानण्यासाठी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणे हा एक उत्तम पर्याय आहे. (bail pola 2022 messages in marathi to wish your family friends through wishes whatsapp status to celebrate this beautiful festival read in marathi)
अधिक वाचा : ओट्समुळे वजन वाढतं ?
बैल पोळ्याला रक्षाबंधनाला बांधलेली राखी बैलाच्या अंगावर सोडून टाकली जाते. त्यामुळे या दिवसापर्यंत प्रत्येक भाऊ आपल्या हातात राखी ठेवत असतो. गेल्या दोन वर्षात आपण बैल पोळा उत्सव उत्साहात साजरा करून शकलो नाही. पण यंदा निर्बंधने हटली आहेत. त्यामुळे हा उत्सव आपण दणक्यात साजरा करू या. त्यासाठी टाइम्स नाऊ मराठीने Messages, Wishes च्या संदेश तयार केले आहेत, त्या माध्यमातून एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो.
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने होतात हे आजार
जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : वजन कमी करायचं आहे?, मग खा 'बटाटा'
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : गरोदरपणात प्या Green Tea आणि पाहा होणारे फायदे
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : डाव्या बाजूला झोपण्याचे खूप फायदे
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल, या खास दिवशी बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. अशा या पवित्र सणाच्या महाराष्ट्रातील तमामा शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!