Lokmanya Tilak Quotes : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार शेअर करून करा अभिवादन

आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची स्थापना केली होती. महात्मा गांधी यांनी टिळकांचा उल्लेख आधुनिक भारताचे निर्माता असा केला होता. टिळकांची भारतात सर्वप्रथम स्वराज्याची मागणी केली होती. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती.

Lokmanya Tilak
लोकमान्य टिळक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी.
  • टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते.
  • टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची स्थापना केली होती.

Lokmanya Tilak Death anniversary : मुंबई :आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची स्थापना केली होती. महात्मा गांधी यांनी टिळकांचा उल्लेख आधुनिक भारताचे निर्माता असा केला होता. टिळकांची भारतात सर्वप्रथम स्वराज्याची मागणी केली होती. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. टिळकांना जेव्हा मंडालेत काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला होता. आज टिळकांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा. (bal gangadhar tilak death anniversary share his quotes on Facebook, instagram, whatsapp, twitter and social media )

''कार्यात यश मिळो वा ना मिळो, प्रयत्न करण्यात कधीही माघार घेता कामा नये.''
 

"माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही."

"मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही! उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे! आपण आपले सण जपले पाहिजेत.”

'जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते.'

''एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे.''

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी