Lokmanya Tilak Birth Anniversary 2022 : ज्या लेखनासाठी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली त्यातले बहुतांश लेखन नव्हतेच टिळकांचे

Lokmanya Tilak Birth Anniversary 2022 in marathi : टिळकांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांना दोनदा राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ज्या लिखाणामुळे  टिळकांनी राजद्रोहाची शिक्षा भोगली त्यापैकी बहुतांश लेखन टिळकांचे नव्हतेच. संपादक म्हणून टिळकांनी त्या लेखनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती.

bal gangadhar tilak
बाळ गंगाधर टिळक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टिळकांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांना दोनदा राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  • परंतु ज्या लिखाणामुळे  टिळकांनी राजद्रोहाची शिक्षा भोगली त्यापैकी बहुतांश लेखन टिळकांचे नव्हतेच.
  • संपादक म्हणून टिळकांनी त्या लेखनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती.

Lokmanya Tilak Birth Anniversary : मुंबई : भारतीय असंतोषाचे जनक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी नेते. टिळकांची ओळख फक्त स्वातंत्र्य सैनिक म्हणून इतकीच सिमीत नाही. स्वराज्याचे आग्रही, यशस्वी संपादक, थोर समाजसुधारक अशीही त्यांची ओळख आहे.

अधिक वाचा :  "महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस फुटीच्या मार्गावर"; पुन्हा राजकीय भूकंप होणार? भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

टिळकांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांना दोनदा राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ज्या लिखाणामुळे  टिळकांनी राजद्रोहाची शिक्षा भोगली त्यापैकी बहुतांश लेखन टिळकांचे नव्हतेच. संपादक म्हणून टिळकांनी त्या लेखनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. मराठी विश्वकोश खंड 17 वा आणि रा.के.लेले यांनी मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या पुस्तकात ही बाब नमूद केली आहे.

अधिक वाचा :  Maharashtra Flood: "अपने बाप का माल है क्या..." पूरपरिस्थितीची पाहणी करताना सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यावर संतापले, पाहा VIDEO

मराठी विश्वकोशातल्या मराठी वृत्तपत्र या नोंदी प्रसन्न अकलूजकर म्हणतात 15 जून 1897 रोजी शिवाजीचे उद्गार या कवितेमुळे पहिल्यांदा राजद्रोहाची दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.  नंतर 1904 मध्ये राष्ट्रीय स्वांतत्र्य चळवळीचा जोर वाढल्याने टिळकांचे केसरीतील लेखन अधिक आक्रमक होत गेले. 24 जून 1908 रोजी टिळकांना पुन्हा राजद्रोहाची शिक्षा झाली. यावेळी ज्या लिखाणासाठी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली ते लेखन नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे होते. परंतु टिळक केसरीचे संपादक होते. संपादक या नात्याने टिळकांनी या लेखनाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनीच मंडाले येथे राजद्रोहाची शिक्षा भोगली.

अधिक वाचा :  Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

रा.के.लेले यांनी मराठी वृत्तपत्राचा इतिहास या ग्रंथात विस्तृत विवेचन केले आहे. 1908 साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला. त्यात आठ लेख सरकारतर्फे अक्षेपार्ह म्हणून सादर करण्यात आले होते त्या लेखन पैकी तीन टिळकांचे व पाच लेख खाडिलकर यांचे होते. दुहेरी इषारा, बॉम्बगोळ्याचा खरा अर्थ, बॉम्बगोळ्यांचे रहस्य, हे उपाय टिकाऊ नाहीत आणि स्फुट सूचना हे पाच लेख खाडिलकरांनी केसरीसाठी लिहिले होते. 1897 आणि 1908  अशा दोन्ही खटल्यात टिळकांच्या लेखनाबरोबरच खाडिलकरांचे लेखही अक्षेपार्ह म्हणून सरकार तर्फे पुढे आणले जावे ही गोष्ट खाडिलकर, टिळकांच्या विचारांशी व लेखनशैलीशी कसे समरस झाले होते ते स्पष्ट करते.

अधिक वाचा :  Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १७

मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा.के.लेले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी