Vasant Panchami 2023, Basant Panchami Food, Vasant Panchami Food, sweet dish : यंदा गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस अर्थात वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी या दिवसालाच बसंत पंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमी हा हिवाळ्यातलाच एक दिवस आहे. यामुळे वातावरणात गारठा जाणवतो. थंडीच्या दिवसात बहरणारी फळे आणि फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वसंत पंचमीला पिवळ्या अथवा केशरी रंगाचे गोड पदार्थ तयार करून त्यांचा सरस्वती देवीला प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे.
वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत पंचमीचा सण हा भारतात खासकरुन उत्तर भारतात मोठ्या प्रणामात साजरा केला जातो. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा करतात. वसंत पंचमी हा दिवस खूप शुभ मानला जातो. वसंत पंचमीला श्री पंचमी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्यात येते. वसंत पंचमी ही माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरी करण्यात येते. पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीची सुरुवात 25 जानेवारी रोजी दुपारी 12.34 वाजता होत आहे. तर 26 जानेवारी रोजी सकाळी 10.28 वाजता समाप्त होत आहे. तिथीनुसार, वसंत पंचमी 26 जानेवारी रोजी साजरी करणं शुभ असेल. वसंत पंचमीचा दिवस हा शुभ कार्यांसाठी आणि लग्नकार्यांसाठी उत्तम समजला जातो.
साहित्य : 250 ग्रॅम बासमती तांदूळ, दूध, 1 वाटी साखर, 1 छोटा चमचा वेलचीपूड, 5 लवंगाच्या पाकळ्या, चिमुटभर खाण्याचा पिवळा रंग, 1 चमचा तूप, 10 बदामाचे काप
कृती : बासमती तांदूळ शिजवून थंड करा. एका पॅनमध्ये पाणी घेऊन उकळवा. पाण्यात लवंग, वेलची पूड आणि खाण्याचा पिवळा रंग टाकून पाणी तापवा. या पाण्यात शिजवलेला बासमती तांदूळ ओता. आता पाणी आणि भाताच्या या मिश्रणात थोडे दूध आणि साखर मिसळून ढवळा. व्यवस्थित एकजीव करा. नंतर भातावर बदामाचे काप टाकून सजवा.
साहित्य : 5 संत्री, 2 लिटर दूध, 250 ग्रॅम साखर, पाव चमचा वेलचीपूड, केशराच्या पाकळ्या, 10 बदामाचे काप
कृती : दूध तापवा नंतर त्यात साखर घाला. आता 2 लिटर असलेले दूध 1 लिटर होईपर्यंत उकळवा. नंतर दूध उकळवणे थांबवा आणि नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या. थंड झाल्यावर दूध फ्रीजमध्ये ठेवा. आता 3 संत्र्यांचा रस काढून दुधात ओतावा आणि 2 संत्र्यांच्या बिया काढून फोडी बारीक तुकडे करून दुधात मिसळा. दूध ढवळून घ्या. वेलची पूड, लवंग, केशर घालून दूध ढवळून घ्या.
साहित्य : 1 लिटर दूध, 2 मोठे चमचे साखर, 1 छोटा चमचा जायफळ पूड, 1 छोटी वाटी बदामाचे काप, अर्धा चमचा वेलचीपूड, 10 केशर पाकळ्या
कृती : 1 लिटर दूध मंद आचेवर उकळवून अर्धा लिटर करून घ्या. आता दुधात साखर, वेलची पूड, केशर मिसळून ढवळा. दुधात बदामाचे काप टाकून सजवा.
साहित्य : 500 ग्रॅम किसलेला लाल भोपळा, 100 ग्रॅम मावा, 125 ग्रॅम साखर, 1 चमचा वेलचीपूड, 1 छोटी वाटी बदामाचे काप, 1 चमचा तूप
कृती : एका भांड्यात तूप टाका त्यावर किसलेला लाल भोपळा भाजून घ्या. या लाल भोपळ्यात मावा आणि साखर टाकून व्यवस्थित ढवळून घ्या. हलवा तयार होऊ लागल्यावर अंतिम टप्प्यात बदामाचे काप टाकून घ्या.
साहित्य : पाव किलो मावा, 1 कप पिठीसाखर, अर्धा कप दूध, 15 केशर पाकळ्या, अर्धा चमचा वेलचीपूड, काजू आणि बदामाचे काप
कृती : केशर पाकळ्या दुधात भिजवून ठेवा. मावा गरम करून घ्या. व्यवस्थित मोकळा करून घ्या. आता माव्यावर दूध ओता. दूध आणि माव्याचे मिश्रण उकळवून ढवळत राहा. हे मिश्रण अर्धे आणि घट्ट होईपर्यंत प्रक्रिया सुरू ठेवा. नंतर गॅस बंद करा. आता दूध नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या नंतर त्या मिश्रणात पिठी साखर मिसळा. घट्ट झालेल्या मिश्रणाचे छोटे पेढे तयार करा. प्रत्येक पेढ्यात केशराच्या पाकळ्या आणि काजू बदामाचे काप टाका. पेढे सजवा आणि नैसर्गिकरित्या आणखी थंड तसेच घट्ट होऊ द्या.