मुंबई: Hair Care Natural Masks: काळे, दाट आणि लांब केस (Black, thick and long hair) ही प्रत्येकाची इच्छा असते, पण ती पूर्ण करण्यासाठी केसांची खूप काळजी घ्यावी लागते. विशेषत: हिवाळ्यात (winters) केस गळणे, तुटणे, केस पातळ होणे आणि कोरडे होणे ही एक सामान्य समस्या बनते. अशा परिस्थितीत केस पातळ (Hair thinning) होणे ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये केस पुन्हा वाढत नाहीत आणि त्यामुळे आपली टाळू रिकामी होते. स्टाइलिंग टूल्सच्या जास्त वापरामुळे ही समस्या उद्भवते. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही हेअर मास्क सांगणार आहोत जे तुम्ही घरीच तयार करू शकता. हा मास्क तुमचे केस पुन्हा चमकदार आणि रेशमी बनवेल.
जास्वंदाच्या फुलांमध्ये कांद्याचा रस मिसळा
कांद्याचा रस केसांना सल्फर पुरवतो ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. दुसरीकडे जास्वंदाचे फूल टाळूचा कोरडेपणा दूर करते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
अधिक वाचा- शिंदे गटात गजानन कीर्तिकरांचा प्रवेश, मुलानंही घेतला मोठा निर्णय
मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
असा बनवा मास्क
सर्व प्रथम, जास्वंदाची फुले वाळवून त्यांची पावडर बनवा. एक वाडगा घ्या आणि त्यात पावडर आणि कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळा. एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट केसांना लावा आणि 1 तासानंतर शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 वेळा लागू करा तुम्हाला लवकरच परिणाम दिसेल.
कढीपत्ता आणि काळे तिळाचा हेअर मास्क
कढीपत्ता आणि काळे तीळ यामध्ये पोषक घटक आढळतात. जे केसांच्या वाढीस मदत करतात, केसांना चमकदार आणि रेशमी बनवतात. त्याचा मास्क केसांसाठी खूप प्रभावी आहे.
मास्क तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य
असा बनवा मास्क
कढीपत्ता धुवून वाळवा आणि काळं तीळ घालून पावडर बनवा. काळं तिळाचं तेल गरम करून बाजूला ठेवा. तयार केलेल्या पावडरमध्ये एलोवेरा जेल आणि गरम तेल एकत्र करून मिश्रण तयार करा. 30 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा. तुमचा मास्क तयार झाला. ते तुमच्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि 45 मिनिटे राहू द्या. 45 मिनिटांनंतर शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. लवकरच तुम्हाला तुमच्या केसांच्या संख्येतील फरक आपोआप दिसेल.