bedroom vastu tips to improve your love life between husband wife healthy relationship tips, Read in Marathi : प्रेम, काळजी, आदर हे प्रत्येक पती-पत्नीच्या नात्याचा आधार आहे. पण काही वेळा लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. दोघांनाही कळत नाही की ही परिस्थिती नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण झाली. यामुळे परिस्थितीमधून मार्ग निघण्याऐवजी ती आणखी चिघळण्याचा धोका वाढतो. काही वेळा या परिस्थितीसाठी संबंधित ठिकाणचा वास्तूदोष पण कारणीभूत असू शकतो. खर तर वास्तू दोषांचा मानवी आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे घरात वाद सुरू होतात. पती आणि पत्नी यांच्यात दुरावा निर्माण होतो. घरातील सुख शांती निघून जाते. सतत घरात कटकटीचे वातावरण असते. जर आपला बेड चुकीच्या दिशेला असेल. घरात एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तूतज्ज्ञाच्या मदतीने हे वास्तूदोष शोधून ते दूर करणे शक्य आहे. हे केल्यानंतर घरात पुन्हा सुख शांती येते. वाद थांबतात. पुन्हा एकदा पती आणि पत्नी यांच्यात प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण होण्यास सुरुवात होऊ शकते.
अनेकजण घरातील बेडची दिशा अधूनमधून बदलत असतात. हा प्रकार टाळावा. बेड हा दक्षिणेला किंवा दक्षिण पश्चिम दिशेला असावा. जर बेड ठेवताना दक्षिण आणि दक्षिण पश्चिम या दोन्ही दिशांचा सुवर्णमध्य गाठता आला तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. पती आणि पत्नी यांच्या नात्यात आणखी जवळीक वाढते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी नांदण्याचे योग निर्माण होतात.
पती पत्नीच्या बेडरूममध्ये कोणत्याही दिशेला कट किंवा टोकदार कोपरे असून चालत नाही. वास्तूतज्ज्ञांना एकदा बेडरूम तपासण्यास सांगावी. बेडरूमचा आकार योग्य असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
पती आणि पत्नी यांच्यासाठी घरात धातुचा बेड वापरणे टाळावे. लाकडी बेड झोपण्यासाठी वापरावा. डबल बेडवर झोपत असल्यास एकच मोठी गादी डबल बेडवर असावी. जर दोन वेगवेगळ्या गाद्या डबल बेडवर जोडून ठेवत असाल तर पती आणि पत्नी यांच्यात तणाव निर्माण होण्याचा धोका वाढतो. तसेच धातुच्या बेडमुळे घरात नकारात्मकता वाढण्याचा धोका असतो. यामुळे धातुचा बेड वापरणे टाळावे.
बेडरूमच्या भिंतींचा रंग हा कायम हलका असा गुलाबी (पिंक), हलका लाल (लाइट रेड) असावा.
वास्तूशास्त्रानुसार प्रेम आणि रोमान्ससाठी पतीच्या डाव्या बाजूस पत्नीने झोपावे
बेडसमोर आरसा लावू नये. आरसा जेवढा मोठा तेवढे पती आणि पत्नी यांच्यात वाद होण्याची शक्यता वाढते. यामुळे बेडरूममध्य आरसा लावताना त्यात बेडचे प्रतिबिंब पडणार नाही अशी काळजी घ्यावी.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.