Being Single : आतापर्यंत तुम्ही नात्यांच्या फायद्यांबद्दल (Relationship) अनेकदा ऐकलं असेल. नाती किती सुंदर असतात किंवा सहजीवनात किती आनंद असतो, याविषयी अनेकदा बोललं जातं. एकमेकांसोबत आनंदाने जगणारी अनेक जोडपीही आपण आजूबाजूला पाहत असतो. त्यामुळे सिंगल असणाऱ्यांना त्यांचा हेवा वाटत राहतो. आपल्याही आयुष्यात असाच एखादा अनुरुप जोडीदार लवकरात लवकर यावा, असं त्यांना वाटत असतं. मात्र त्याचवेळी सिंगल असण्याचे किती फायदे (Benefits of being single) आहेत, याकडे लक्ष जात नाही. सिंगल असण्याचे अनेक फायदे असतात जे विवाहित मंडळींना मिळत नाहीत. अशा काही फायद्यांचा विचार केला, तर सिंगल लोकांना आपलं आयुष्य सुंदर असल्याची अनुभूती येईल आणि त्यांच्या लग्न झालेल्या मित्रांचा चांगलाच जळफळाट होईल.
सिंगल असणाऱ्यांकडे सेल्फ ग्रुमिंगसाठी भरपूर वेळ असतो. सिंगल असताना तुम्ही तुमचा पर्सनल फिटनेस आणि नेटवर्किंगसाठी वेळ देऊ शकता. एक हेल्दी आणि आनंदी आयुष्य जगू शकता. वैवाहिक जीवनात प्रत्येकजण स्वतःसाठी हवा तितका वेळ देऊ शकत नाही. मात्र सिंगल व्यक्ती आपल्या वेळेचं नियोजन आपल्याला हव्या त्या पद्धतीने करू शकते.
विवाहित लोकांपेक्षा सिंगल लोकांना कमी तणावपूर्ण आयुष्य जगता येतं. लग्न झालेल्या व्यक्तींना आपल्या जोडीदारासोबतच कुटुंबातील इतर सदस्यांची आणि मुलांची काळजी घ्यावी लागते. त्यांची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे अनेकदा लग्न झालेले तरुण हे काहीशा दबावाखाली असल्याचं दिसतं. मात्र सिंगल तरुण किंवा तरुणींना हे टेन्शन तुलनेने कमी असतं.
अधिक वाचा - Effect of Divorce : आईवडिलांच्या घटस्फोटांचा मुलांवर होतो गंभीर परिणाम, दिसतात ही लक्षणं
जेव्हा मूड येईल आणि वेळ मिळेल तेव्हा सिंगल लोक आरामात झोपू शकतात. आपल्या कामाच्या वेळेनुसार झोपेेचं नियोजन करू शकतात. त्यांना इतरांच्या शेड्युलनुसार आपल्या झोपेच्या शेड्युलमध्ये बदल करावे लागत नाहीत. त्यामुळे दिवसभर सिंगल व्यक्ती फ्रेश राहत असल्याचं दिसतं.
महिलांचा विचार करता, सिंगल महिला अधिक सक्षमपणे आपल्या करिअरवर फोकस करू शकतात. घरच्या जबाबदाऱ्या तुलनेनं कमी असल्यामुळे त्यांना आपलं पूर्ण लक्ष कामावर केंद्रीत करता येतं. पुरुषांनाही घरच्या जबाबदाऱ्या नसल्यामुळे बहुतांश वेळ कामासाठी देता येतो. त्यामुळे सिंगल व्यक्ती विवाहित व्यक्तींपेक्षा अधिक वेगाने करिअरमध्ये प्रगती करू शकतात.
अधिक वाचा - 8 wives : आठ बायकांसोबत सुखानं राहण्यासाठी तो बांधतोय घर, खवळलं शेजाऱ्यांचं पित्त
सिगल तरुणांना आणि तरुणींना कुठलाही प्लॅन करताना आपला जोडीदार किंवा मुलांचा विचार करण्याचा प्रश्न नसतो. ते वाटेल तेव्हा वाटेल तो प्लॅन करू शकतात आणि तो अंमलात आणू शकतात. मित्रमंडळींसोबत फिरणे, पार्टी करणे, नाईटआऊट करणे, मोठ्या ट्रिप्स काढणे या गोष्टी सिंगल लोकांना विवाहित लोकांच्या तुलनेत अधिक सहजपणे शक्य होतात.
सिंगल तरुणांनी लग्नासाठी झुरत बसण्याऐवजी आपल्या सिंगल असण्याच्या फायद्यांकडे लक्ष द्यावं आणि आयुष्याचा आनंद घ्यावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जातो.