Benefits of Camphor: कापराचे फायदे ऐकून व्हाल थक्क, पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या अनेक समस्या होतात दूर

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 20, 2022 | 10:40 IST

Home Remedies: कापूरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. हे अँटी-बॅक्टेरियल (anti-bacterial) गुणधर्मांनी समृद्ध आहे.

Camphor Benefits
देवघरातला कापूर शरीरासाठी फायदेशीर, दूर करतो अनेक समस्या 
थोडं पण कामाचं
  • एक चिमूटभर कापूर (pinch of camphor) आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • नैसर्गिक कापूर शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतो.
  • कापूर (Camphor) बऱ्याचदा पूजा किंवा हवन करताना वापरला जातो.

मुंबई: Camphor Benefits: कापूर (Camphor)  बऱ्याचदा पूजा किंवा हवन करताना वापरला जातो. मात्र एक चिमूटभर कापूर (pinch of camphor) आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. कापूरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. हे अँटी-बॅक्टेरियल (anti-bacterial)  गुणधर्मांनी समृद्ध आहे. नैसर्गिक कापूर शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतो. चला जाणून घेऊया कापूर कोणत्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

डोकेदुखीपासून आराम

कापूर खूप थंडावा देतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अर्जुन वनस्पतीची साल, पांढरे चंदन आणि सुंठ यामध्ये कापूर मिसळून डोक्याला लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. डोकं दुखत असल्यास अर्जुन वनस्पतीची साल, पांढरे चंदन आणि सुंठ समप्रमाणात मिसळून पेस्ट बनवून डोक्याला लावा यामुळे डोकेदुखीपासून मुक्ती मिळेल.

अधिक वाचा- 11 व्या दिवशी Brahmastra नं कमावला इतक्या कोटींची गल्ला, जाणून घ्या अपडेट्स

केस होतात हेल्दी

कापूर केसातील कोंडा, कोरडेपणा, केस गळणे यासारख्या समस्या दूर करते. कापूर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि केस चमकदार होतात. जर तुम्हाला दाट आणि लांब केस हवे असतील तर खोबरेल तेलात कापूर मिसळून लावल्याने फायदा होतो.

आजारपणात ही ठरते फायदेशीर

सर्दी आणि तापामध्ये कापूर खूप फायदेशीर आहे. सर्दी-ताप किंवा खोकला असल्यास कोमट मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज करावा. गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यानं बंद झालेलं नाक उघडते आणि सर्दी आणि तापापासूनही आराम मिळतो.

दुखण्यापासून आराम

पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या असल्यास तेलात कापूर मिसळून मालिश करा यामुळे आराम मिळतो. थकवा जाणवत असल्यास तीळ किंवा मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मालिश करावी.

स्किनसाठी फायदेशीर

कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कापूरचा वापर केल्यानं मुरुमा दूर होतात. हे बॅक्टेरियाला दूर ठेवते जेणेकरून मुरुम विकसित होत नाहीत.

डाग होतात दूर 

जर कोणाच्या तोंडावर पिंपल-नखांचा डाग असेल तर तो कापूर लावून काढता येतो. नारळाच्या तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर लावावे, त्यामुळे डाग दूर होतात आणि त्वचा चांगली होते.

अधिक वाचा-  नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी हे साहित्य खूप महत्त्वाचं, लिस्ट तयार करून आजपासूनच सुरू करा शॉपिंग

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया दत्तक घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी